शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

उद्योजकांचे प्रश्न मार्गी लागतील

By admin | Updated: December 22, 2016 01:10 IST

प्रदीप पेशकार : भाजप उद्योग आघाडीतर्फे चर्चासत्र; उद्योजकांनी मांडले प्रश्न

कोल्हापूर : उद्योग क्षेत्राकडे आश्वासक विकासाला पूरक क्षेत्र म्हणून पाहिले गेले आहे. त्यामधील अडचणी समजून घेण्यासाठी भाजपने रचना केली आहे. दोन वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्न समजून घेणारी व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योजकांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असे प्रतिपादन भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी बुधवारी रात्री येथे केले.ताराबाई पार्क येथील रेसिडेन्सी क्लब येथे भाजप उद्योग आघाडीतर्फे उद्योजकांच्या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यामध्ये श्रीधर व्यवहारे, उद्योजक चंद्रकांत जाधव, मोहन घाटगे, प्रकाश मालाडकर, विश्वजित कुलकर्णी उपस्थित होते.यावेळी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रदीप पेशकार यांनी उद्योजकांकडून समस्या व त्यावरील पर्याय जाणून घेतले. चंद्रकांत जाधव यांनी उद्योजकाला ताकद दिली पाहिजे. यासाठी अशी चर्चासत्रे राज्यभरात घेतली जावे, अशी मागणी केली. प्रकाश मालाडकर यांनी भाजप उद्योग आघाडीचे उद्दिष्ट स्पष्ट केले. उद्योजक संजय पाटील यांनी उद्योगक्षेत्राला वीजदर कमी करावा, असे सांगून समस्या सोडविण्यासाठी पर्याय देतो; परंतु ते पूर्ण करण्याची तारीख जाहीर करावी, असे सांगितले. उद्योजक शामसुंदर मर्दा यांनी इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाला मदत करावी, तसेच कोल्हापुरात ईएसआय रुग्णालय व्हावे, असे सांगितले. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक प्रकाश चरणे यांनी औद्योगिक वसाहतींमधील मालमत्तेला लागलेला बी टेन्युअर रद्द करावा, असे सांगितले.‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील यांनी जिल्ह्णातील सर्व लहान-मोठ्या उद्योगांना लागणारे परवाने व मंजुऱ्या स्थानिक पातळीवर मिळाव्यात, मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमध्ये कोल्हापूरचा समावेश करावा, अशी मागणी केली. ‘गोशिमा’चे संचालक संग्राम पाटील यांनी बंद विमानसेवा पुन्हा सुरू करावी, शिवाजी विद्यापीठ येथे एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शनल सेंटर सुरू करावे, असे सांगितले. ‘मॅक’चे अध्यक्ष संजय जोशी यांनी ‘आयटीआय’साठी असोसिएशनला जागा व अनुदान मिळावे; औद्योगिक वसाहतींमध्ये एफएसआय वाढवून द्या, व इंडस्ट्रियल वेस्टसाठी जागा द्या, असे सांगितले. ‘गोशिमा’चे अध्यक्ष जे. आर. मोटवाणी यांनी उद्योग विस्तारासाठी जागा देण्याची तर राज्य उद्योग मित्र बैठक कोल्हापुरात घ्यावी; किमान वेतन समितीवर उद्योजक प्रतिनिधी घेण्याची सूचना श्रीकांत दुधाणे यांनी मांडल्या.भविष्य निर्वाह निधीच्या अधिकाऱ्यांची मोगलाईभविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी उद्योजकांना मोगलाईप्रमाणे त्रास द्यायला सुरुवात केली आहे. ते मनमानी पद्धतीने उद्योजकांना वेठीस धरत आहेत. पोटतिडकीने नरेंद्र मोदी यांना मतदान करून प्रस्थापितांना आम्ही घरात बसविले; परंतु तेच दिवस परत आले आहेत का, असे यानिमित्ताने वाटू लागल्याची खंत उद्योजक उदय दुधाणे यांनी व्यक्त केली. भाजपने देणगी कॅशलेस स्वीकारून सुरुवात करावीसर्व राजकीय पक्षांना दोन हजार रुपयांपर्यंतची निनावी देणगी स्वीकारण्याची मुभा देण्यात आली आहे. या देणग्या सर्व राजकीय पक्षांनी कॅशलेस स्वीकाराव्यात व त्याची सुरुवात भाजपने करून चांगला संदेश द्यावा, अशी सूचना उद्योजक कुशल सामंत यांनी मांडली.