शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी कामगार आॅगस्टमध्ये लढ्याचे रणशिंग फुंकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 06:38 IST

राज्य सरकारकडून आश्वासने आणि पोकळ घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडलेले नसल्यामुळे राज्यभरातील ऊसतोडणी-ओढणी कामगारांमध्ये कमालीची नाराजी आहे.

कोल्हापूर : राज्य सरकारकडून आश्वासने आणि पोकळ घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडलेले नसल्यामुळे राज्यभरातील ऊसतोडणी-ओढणी कामगारांमध्ये कमालीची नाराजी आहे. आगामी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधावे यासाठी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात परळी वैजनाथ येथून लढ्याचे रणशिंग फुंकले जाणार आहे. कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणीसह मजुरीवाढीच्या नव्या कराराची मागणी नव्याने करण्यात येणार आहे.ऊसतोडणी कामगार संघटनांच्या पुढील लढ्याची दिशा ठरविण्यासाठी शनिवारी सकाळी कोल्हापुरात बैठक झाली. संघटनेचे राज्याध्यक्ष डी. एम. कराड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्याचे सरचिटणीस प्रा. आबासाहेब चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीत बोलताना कराड म्हणाले, ऊसतोडणी कामगारांची विद्यमान राज्य सरकारने फसवणूकच केली आहे. कल्याणकारी महामंडळ स्थापन करतो, अशी घोषणा करून सत्तेवर आलेल्या या सरकारने निव्वळ घोषणा करण्यापलीकडे काही केलेले नाही. मंडळासाठी परळी वैजनाथ येथे कार्यालय स्थापन केल्याचे सांगितले जाते; पण गेले वर्षभर एकाही मजुराची नोंदणी झाली नाही अथवा त्यांना कुठल्याही सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळालेला नाही. मजुरांची ही घोर फसवणूक आहे. याशिवाय स्वत: पंकजा मुंडे व जयंत पाटील यांनी मजुरीवाढीच्या संदर्भातही तीन वर्षांचा करार पाच वर्षांवर नेऊन मजुरांचे एक वर्षाचे नुकसान केले. हे करताना ऊसतोडणी कामगार संघटनेला साधे विश्वासातही घेतले नाही.या सरकारने मजुरांच्या सामाजिक सुरक्षेला महत्त्व दिलेले नाही. साखर कारखानदारांचा मात्र फायदा झाला आहे. वाहतूकदारांचीही फसवणूक वाढत असताना याला कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून वेसण घालता आली असती; पण शासनाने ते होऊ दिलेले नाही. फसवणूक करणाऱ्यांना एकप्रकारे अभयच दिले आहे. त्यामुळेच आता ऊसतोडणी-ओढणी मजुरांचे प्राबल्य असणाºया परळी वैैजनाथमधून लढ्याचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला आहे, असे कराड यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती