शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यांचे सामुदायिक रजा आंदोलन अखेर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 17:02 IST

कोल्हापूर महापालिकेतील अभियंत्यांनी अखेर तीन दिवसांनंतर सामुदायिक रजेचे आंदोलन सोमवारी मागे घेतले. महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये आयुक्तांनी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. मात्र, या बैठकीत अभियंत्यांनी होत असलेल्या त्रासाबाबत खदखद व्यक्त केली.

ठळक मुद्देअभियंत्यांचे सामुदायिक रजा आंदोलन अखेर मागेमहापौर, पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा

कोल्हापूर : महापालिकेतील अभियंत्यांनी अखेर तीन दिवसांनंतर सामुदायिक रजेचे आंदोलन सोमवारी मागे घेतले. महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये आयुक्तांनी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. मात्र, या बैठकीत अभियंत्यांनी होत असलेल्या त्रासाबाबत खदखद व्यक्त केली.नगरसेवक अशोक जाधव यांनी उपशहर अभियंता रमेश मस्कर यांच्याशी वादावादी करत एकेरी भाषेचा वापर केल्यानंतर महापालिकेतील सर्व अभियंता सामुदायिक रजेवर गेले होते. आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता, सहा. अभियंता, उपशहर अभियंता अशी महत्त्वाची रिक्त पदांमुळे कामावर असणाऱ्या अभियंत्यांना लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापालिकेत बैठक झाली.शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश म्हसकर म्हणाले, अतिक्रमण आणि विद्युत विभागासाठी उपायुक्त दर्जाचे अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देऊन काम करून घेणे कठीण जात आहे. त्याचबरोबर अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अभियंत्यांना जबाबदारी नसलेली कामे करावी लागत आहेत. त्यावर स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी अभियंत्यांच्या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात, असे सुचविले.

नगररचना विभाग आणि वॉर्ड आॅफिस हे सक्षम असले पाहिजे. कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यासाठी आठवड्यातून किमान दोन दिवस अतिक्रमण मोहीम घ्यावी, अशी सूचना केली. महापौर लाटकर यांनी शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित झाली पाहिजे.

अभियंत्यांच्या प्रत्येक विषयांबाबत आयुक्तांकडून आढावा बैठक घेण्यात येईल. या आढावा बैठकीत सर्वांनी आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे. पदोन्नती समितीची १५ दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. आयुक्तांनीही मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, गटनेते सत्यजित कदम, विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक ईश्वर परमार, माजी नगरसेवक राजेश लाटकर आदी उपस्थित होते.व्हिडिओ कॉन्फरन्सची सोय कराचारही उपशहर अभियंत्यांना वारंवार महापौर, आयुक्तांच्यासह पदाधिकाऱ्यांकडे यावे लागते. त्यांचा यामध्ये वेळ जातो. महापालिकेने व्हिडिओ कॉन्फरन्सीची सोय करावी, अशी सूचना ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी केली. आयुक्तांनी दोन महिन्यांत अशाप्रकारची सेवा सुरू करू, अशी ग्वाही दिली.आयुक्तांकडून डोसमहापालिका आपली आहे असे समजून सर्वांनी काम केले पाहिजे. आम्हीही खातेप्रमुख म्हणून काम केले आहे. त्यामुळे मनाला लावून घेण्याची गरज नाही. सर्वांनी वेळ देऊन टीमवर्कच्या माध्यमातून गतीने काम करावे. प्रलंबित फायलींच्या कामांसाठी सुटीच्या दिवशीही कामे करावी लागतील, असे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. मनुष्यबळ कमी असताना आपण चांगले काम करत आहोत. याबद्दल वरिष्ठ पातळीवर कौतुक होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर