शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

‘माझं कोल्हापूर, माझा रोजगार’ माध्यमातून ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 16:02 IST

पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एक लाख परप्रांतीय मजूर आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे स्थानिक तरुणांना लाखो नोकऱ्यांची दारे खुली झाली आहेत. ज्या उद्योगक्षेत्राला कुशल, अकुशल कामगारांची गरज आहे, त्याकरिता उद्योजकांकडून मागणी आणि असे युवक-युवती तयार करणाऱ्या आौद्योगिक

ठळक मुद्देपालकमंत्री पाटील यांचा पुढाकार । व्हिडिओ कॉन्फरन्सतर्फे ६५ उद्योजकांशी संवाद

कोल्हापूर : उद्योजकांना कुशल कामगारांची, तर अनेकांना हातचा रोजगार गेल्यामुळे नोकरीची गरज आहे. या मरगळलेल्या उद्योगविश्वाला बूस्टर डोस देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांंनी ‘माझं कोल्हापूर, माझा रोजगार’ ही नवी संकल्पना शनिवारी मांडली. तिची माहिती देण्यासाठी डी. वाय. पाटील मेडिकल काॅलेजमध्ये त्यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे ६५ नामवंत उद्योजकांशी संवाद साधला व या उपक्रमाचा श्रीगणेशा केला. स्थानिक रोजगार स्थानिक तरुणांनाच मिळाला पाहिजे, या भूमिकेतून हे प्रयत्न सुरू झाले असून, त्यास उद्योजकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एक लाख परप्रांतीय मजूर आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे स्थानिक तरुणांना लाखो नोकऱ्यांची दारे खुली झाली आहेत. ज्या उद्योगक्षेत्राला कुशल, अकुशल कामगारांची गरज आहे, त्याकरिता उद्योजकांकडून मागणी आणि असे युवक-युवती तयार करणाऱ्या आौद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यामध्ये समन्वय व्हावा, यासाठीच ही चर्चा आयोजित केली आहे.

या चर्चेत नामवंत उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, यंत्रमाग व हॉटेल व्यावसायिक, आदींनी सहभाग घेतला. यावेळी उद्योजकांच्या शंकांचे निरसन स्वत: पालकमंत्री पाटील, साहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, एम.आय.डी.सी.चे विभागीय अधिकारी धनंजय इंगळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने, जिल्हा उद्योग केंद्राचे सरव्यवस्थापक एस. डी. शेळके, नाबार्डचे साहाय्यक सरव्यवस्थापक नंदू नाईक , जिल्हा व्होकेशनल एज्युकेशन प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी सोनवणे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी केले.

 

जॉब फेअर घेणारउद्योजकांच्या मागणीप्रमाणे कोल्हापुरातील स्थानिक युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता लॉकडाऊन संपल्यानंतर कोल्हापूरसह इचलकरंजी व महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या विविध वसाहतींमध्ये जॉब फेअर घेतला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी Carrier@missionrojgar.com यावर नोंदणी करावी, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.

 

कोल्हापूरच्या विकासाला बळ देणारे हे पाऊल आहे. त्यासाठी डी. वाय. पाटील समूह व शिक्षण संस्थेची लागेल ती सर्व मदत देण्यास आम्ही तयार आहोत. कोरोनाने निर्माण केलेले हे संकट आहे. त्यातून आपण संधी निर्माण करू आणि कोल्हापूरला पुढे नेऊ. त्यासाठी तुम्ही सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा.- ऋतुराज पाटील, आमदार

 

परप्रांतीय कामगार सोडून गेल्यामुळे स्थानिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याकरिता स्थानिकांनी नेटाने काम करावे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनीही कुशल मनुष्यबळ तयार करावे.- चंद्रकांत जाधव, आमदार

 

कामगारांना आम्ही प्रशिक्षण देऊ शकतो. ग्रामीण भागातील कामगारांना संधी देऊ. सेंट्रिंंग कामगार, प्लंबर यांनाप्रशिक्षण देऊन कामावर घेऊ. त्यासाठी क्रिडाईतर्फे जाहिरात देण्यात येईल.- राजीव परीख, अध्यक्ष क्रिडाई, महाराष्ट्र

 

आम्ही कौशल्य विकास केंद्र स्थापण्यासाठी प्रयत्नशील आहोत.त्यासाठी त्वरित परवानगी द्यावी.- गोरख माळी, अध्यक्ष, कागल पंचतारांकितऔद्योगिक वसाहत

 

जिल्ह्यात एक लाख कामगारांची गरज भासणार आहे. डीकेटीई संस्थेत ४५० लोकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार तीन-चार महिन्यांत १० हजार कामगार तयार होतील.- सतीश कोष्टी, अध्यक्ष, पॉवरलूम विव्हर्स सोसायटी

कापड बनविण्यात कामगारांचा मोठा तुटवडा भासतो. पुढील तीन वर्षांत अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार करून दिला पाहिजे.- शामसुंदर मर्दा, ज्येष्ठ यंत्रमाग व्यावसायिक

 

प्रशिक्षणासाठी शासनाने विद्यावेतन द्यावे; त्यामुळे इंडस्ट्रीज सुरू होतील. इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनर्फे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे.- सतीश पाटील, अध्यक्ष, इचलकरंजी एअरजेट असोसिएशन

 

स्थलांतरित कामगार पुन्हा येणार नाहीत. त्यामुळे स्थानिकांना अंग मोडून काम करायची सवय लावावी. नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचा लाभ घ्यावा.-किरण पाटील, ज्येष्ठ उद्योजक

 

बाहेरून येणारे लोक फक्त काम करतात. येथील भूमिपुत्र हे कायद्याचा वापर करून कारखानदारांना वेठीस धरतात, यावर मार्ग काढावा. - प्रकाश गौड, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन

 

टॅग्स :jobनोकरीMIDCएमआयडीसीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील