शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

‘भाजप’च्या सत्तेची अंत्ययात्रा सुरू : मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:40 IST

कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून, ही परिवर्तन यात्रा म्हणजे भाजपच्या ...

कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून, ही परिवर्तन यात्रा म्हणजे भाजपच्या सत्तेची अंत्ययात्रा सुरू झाल्याची घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.थापाड्या सरकारला लोक कंटाळले असून, त्यांनी राज्यात व देशातही परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अजित पवार यांनी सभेत सांगितले.राष्टÑवादीच्या परिवर्तन यात्रेत सोमवारी सायंकाळी येथील मुस्कान लॉन येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राष्टÑवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.मुंडे म्हणाले, पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी जरा महाराष्टÑाच्या मंत्रिमंडळात डोकावून पाहावे. आमच्यावर टीका करणाºया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तर महापुरुषांच्या फोटोत घोटाळा केला. सरकारी प्रेसमध्ये पूर्वी ५२ रुपयांना मिळणारे महापुरुषांचे फोटो १७०० रुपयांना माथी मारले. त्यांच्यासह १६ मंत्र्यांनी ९० हजार कोटींचा घोटाळा केला. माझा आरोप खोटा असला तर मुख्यमंत्र्यांनी खुशाल मला चौकात फाशी द्यावी; पण हे सरकार मंत्र्यांना पाठीशी घालत असून, १५ वर्षांच्या नवसाने भाजपला मिळालेले सत्तेचे मूल घोटाळ्यामुळे २०१९ मध्ये घरी जाणार आहे. मोदी लाटेत कोल्हापूरकरांनी धनंजय महाडिक यांना खासदार केले. आता कोणतीच लाट नसल्याने ‘बस एकच निर्धार पुन्हा धनंजय महाडिकच खासदार’ असे आवाहनही मुंडे यांनी केले.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, धनंजय महाडिक यांचे लोकसभेतील कामकाज उत्तम असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. हे जरी असले तरी पक्षातील छोट्यातील छोट्या कार्यकर्त्याची गरजही पक्षाला आहे. हलक्या कानाचे राहू नका. कॉँग्रेसलाही सोबत घेऊन पुढे जायचे असून, कोणालाही बोट ठेवायला जागा नको.खासदार महाडिक म्हणाले,‘भाजप सरकार केवळ घोषणाबाज सरकार असून, देशात २५ हजारांहून अधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्या. देशात कोणताही घटक समाधानी नाही. कोल्हापूरची विमान सेवा, रेल्वे, पासपोर्टसह अनेक प्रश्न मार्गी लावलेच, त्याशिवाय संसदेत प्रभावी कामगिरी केल्यानेच तीन वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मान झाला.’यावेळी आर. के. पोवार यांनी स्वागत केले. आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, महापौर सरिता मोरे, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, मानसिंगराव गायकवाड, व्ही. बी. पाटील, सारंग पाटील, अशोकराव जांभळे, संग्राम कोते-पाटील, अनिल साळोखे, राजेश लाटकर, आदिल फरास, जहिदा मुजावर, संगीता खाडे, रोहित पाटील, आदी उपस्थित होते.मुले कॉँग्रेसची, बारसे भाजपकडूनपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना मुंडे म्हणाले, दोन्ही कॉँग्रेसमधील लोक घ्यायचे, त्यांच्यावर पैसा लावून विजय मिळवायचा आणि ‘कमळ’ फुलल्याचे सांगायचे. हे म्हणजे मुले दोन्ही कॉँग्रेसची आणि बारसे भाजपकडून, अशी अवस्था आहे.