शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

गडहिंग्लजची डिसेंबरअखेर हद्दवाढ! चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:50 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या हद्दवाढीची घोषणा आॅक्टोबरअखेर होईल. त्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून येत्या डिसेंबरअखेर प्रलंबित हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयातील बैठकीत मंगळवारी दिली.‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या प्रयत्नामुळे मुंबई येथे ही बैठक बोलाविली होती. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, ...

ठळक मुद्देगडहिंग्लज नगरपालिकेच्या हद्दवाढीसंदर्भात मुंबईत बैठकगडहिंग्लज शहराच्या उपनगरातील लोकांना नागरी आणि पायाभूत सुविधा देण्यासाठी हद्दवाढीची आवश्यकता

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या हद्दवाढीची घोषणा आॅक्टोबरअखेर होईल. त्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून येत्या डिसेंबरअखेर प्रलंबित हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयातील बैठकीत मंगळवारी दिली.

‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या प्रयत्नामुळे मुंबई येथे ही बैठक बोलाविली होती. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, उपसचिव सतीश मोघे, नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी, हद्दवाढ कृती समितीचे अध्यक्ष डॉ. एम. एस. बेळगुद्री आदींच्या उपस्थितीत ही बैठक झाली. हद्दवाढीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता व अहवाल तयार करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले.

नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, नगरपालिका व बड्याचीवाडी ग्रामपंचायतीची हरकत नसेल, तर गडहिंग्लजच्या हद्दवाढीत काहीच अडचण नाही. परिपूर्ण प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तातडीने मंजुरी दिली जाईल.‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, गडहिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढीच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी.

नगराध्यक्ष स्वाती कोरी म्हणाल्या, गडहिंग्लज शहराच्या उपनगरातील लोकांना नागरी आणि पायाभूत सुविधा देण्यासाठी हद्दवाढीची आवश्यकता आहे.कृती समितीचे अध्यक्ष डॉ. बेळगुद्री म्हणाले, १९८७ पासून हद्दवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेच्या कालबद्ध कार्यक्रमासह हद्दवाढीची उद्घोषणा व्हावी.बैठकीस उपनगराध्यक्ष उदय पाटील, नगरपालिका प्रकल्प अधिकारी नितीन देसाई, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे, नगरअभियंता रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष वसंत यमगेकर, शिवसेनेचे दिलीप माने, काँगे्रसचे बसवराज आजरी, ‘मनसे’चे नागेश चौगुले, कृती समितीचे कार्याध्यक्ष शिवाजी होडगे, निमंत्रक रमजान अत्तार, इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र कावणेकर आदींसह अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.गडहिंग्लज शहराच्या७० वर्षांपासून प्रलंबित हद्दवाढीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपण आग्रही पाठपुरावा केला. त्यामुळे त्यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेऊन या प्रश्नाला गती दिली. हद्दवाढीचा प्रश्न आता नक्कीच मार्गी लागेल, यात शंका नाही. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.- समरजितसिंह घाटगे, अध्यक्ष, ‘म्हाडा’ पुणे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाchandrakant patilचंद्रकांत पाटील