कोल्हापूर : बाजार समितीने गूळ विभागात सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम अडत्यांनी रोखली. बेकायदेशीर बांधकामे पाडा मगच आमच्याकडे या, अशी भूमिका अडत्यांनी घेतली, तर अडत्यांच्या मालकीच्या प्लॉटपेक्षा रस्त्यात कोणालाही शेड उभा करता येणार नाही. यावर बाजार समिती ठाम राहिल्याने अतिक्रमणाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.दुकानदारांनी प्लॉटच्या पुढे जादा उभे केलेले शेड काढून घेण्यासाठी गेली सहा महिने समितीच्या प्रशासकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गूळ वगळता सर्वच विभागांतील अडत्यांनी अतिक्रमणे काढून घेतली, पण गुळाचा हंगाम असल्याने एप्रिलपर्यंत मुदतवाढ गूळ अडत्यांनी मागितली होती. हंगाम संपून चार महिने उलटले तरी अतिक्रमण काढून घेतली नसल्याने समितीने नोटीस देऊन अडत्यांना स्वत:हून काढण्यास सांगितले होते. अडत्यांनी जुमानले नसल्याने समितीने कारवाई सुरू केली. आज फॅब्रिकेटर्स घेऊनच प्रशासक डॉ. महेश कदम यांनी कारवाई सुरू केली. अडत्यांनी अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवातही केली, पण तोपर्यंत काहींनी विरोध केल्याने कारवाई थांबली. शेड काढावेच लागतील : कदमअडत्यांनी गूळ हंगाम संपताच अतिक्रमण काढून घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तोपर्यंत समितीच्या रेकार्डनुसार प्रत्येकाच्या प्लॉटची मोजणी करून अतिक्रमण निश्चित केले. त्यानुसार नोटीस पाठवून स्वत:हून काढण्यास सांगितले होते. बहुतांशी जणांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली, पण काहींनी आडमुठे धोरण घेतले आहे. आता सरकारी मोजणीची मागणी अडते करत आहेत, प्रत्येकवेळा नवीन मुद्दे पुढे करत टाळाटाळ करणे योग्य नाही. प्लॉटपेक्षा जादा उभारलेले शेड हे अडत्यांना काढावेच लागतील. ३१ जुलैपर्यंत त्यांनी स्वत:हून ते काढून घ्यावेत, अन्यथा पुढील कार्यवाही केली जाईल, असे प्रशासक डॉ. महेश कदम यांनी सांगितले. यावेळी सहायक सचिव मोहन सालपे उपस्थित होते.४बेकायदेशीर बांधकामे पाडा आणि मग आमची अतिक्रमणे काढा, अशी भूमिका अडत्यांची आहे, पण समितीच्या मालमत्तेविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश न्यायालयाचे असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात अडचणी आहेत. ४ते प्लॉट संचालकांनी ठरावाने दिले असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले. कारवाई नव्हे मदत -बहुतांशी अडते अतिक्रमण काढून घेण्यास तयार आहेत, त्यांना मदत हवी असल्याने आज फॅब्रिकेटर्स, मजुरांची सोय करून दिली होती. -अनेकांनी आमच्या मदतीने अतिक्रमणे काढूनही घेतली आहेत. त्यानुसार गूळ विभागात मदत करण्याच्या हेतूने आपण तिथे गेलो होतो.मग प्लॉट खुदाईला परवानगी कशी ?प्रशासकांना मालमत्तेबाबत निर्णय घेता येत नाहीत, तर वजन काट्याशेजारील प्लॉट खुदाईला लेखी परवानगी कशी दिली ? रस्त्यात हॉटेल उभी केली आहेत, ती दिसत नाहीत का? समितीचे इंजिनिअर कुलकर्णी जाणीवपूर्वक दिशाभूल करत असल्याचा आरोप अडत्यांनी केला.
अतिक्रमण हटाव मोहीम रोखली
By admin | Updated: July 22, 2014 00:43 IST