शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

बेकायदेशीर फार्म हाऊसचे गगनबावड्यात अतिक्रमण

By admin | Updated: June 13, 2017 00:12 IST

तलावाभोवतीही इमारती : बांधकाम परवान्याच्या चौकशीची गरज

चंद्रकांत पाटील ।  -लोकमत न्यूज नेटवर्कगगनबावडा : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला असणारा गगनबावडा तालुका म्हणजे निसर्गाने नटलेला तालुका होय. दऱ्या-खोऱ्यात वसलेली गावे आणि त्यात सौंदर्य वाढविणारे वेसरफ, लखमापूर, कोदे व अणदूर हे चार तलाव आहेत. या तलावांभोवती कोणतीही मान्यता न घेता कित्येक उच्चभ्रू लोकांनी आपली फार्म हाऊस उभी केलेली आहेत. धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून, यावर कारवाई करण्याची गरज आहे. या तलावांभोवती असणाऱ्या जमिनीला एरव्ही हजारातही एकराला किंमत नव्हती, परंतु अगदी घराघरांत जमिनीचे एजंट निर्माण झाले आणि एजंटांच्या वाढत्या संख्येने धनवान लोक लाखाच्या पुढे गुंठ्याला किंमत मोजून ही जमीन खरेदी करू लागले. मुळात या जमिनीमध्ये लाखो रुपये खर्च करून शेती करणे नगण्यच आहे. तरीही येथे मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला गेला. हा पैसा नेमका आला कोठून?हा यक्षप्रश्न आहे. या ठिकाणी प्रशस्त बंगले अस्तित्वात येऊ लागले. हे बंगले बांधताना किती लोकांनी परवाना घेतला, हा संशोधनाचा विषय आहे. तलावाशेजारी बांधकाम करताना पाटबंधारे विभागाचा परवाना आवश्यक असून, कित्येकजणांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. काही लोकांनी वारेमाप रुपये खर्च करून आपला पैसा जमिनीत गुंतवला असून, तेथे टोलेजंग बंगले बांधून सुटीच्या काळात मोठ्या प्रमाणात पार्ट्या रंगताना दिसतात. त्याचबरोबर तेथे मद्यपी लोकांचा वावर वाढताना दिसून येतो. गगनबावड्यात विदर्भ, मराठवाडा याबरोबर परराज्यातील लोकांनीही जमिनी घेऊन आपला पैसा मुरविला आहे. कित्येक ठिकाणी जमीन विकणारे शेतकरीच (मूळ मालक) तेथे कामगार म्हणून काम करीत आहेत. या बेकायदेशीर बांधकामावर आळा घालणे गरजेचे असून, तहसील विभाग या विषयावर कोणती भूमिका घेतोय, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.सर्वसामान्यांची : मोठी फरफटसर्वसामान्य शेतकऱ्याला शेतात घर बांधायचे असले तरी आरोग्य, महावितरण, सार्वजनिक बांधकाम येथपासून ते तहसील कार्यालयापर्यंत खेटे मारावे लागतात. धनदांडग्यांचे फार्म हाऊस मात्र काही दिवसांत कसे उभे राहतात, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत, तालुक्यातील कोदे धरण, वेसरफ धरण, अंदूर धरण, असलज, शेणवडे, बोरबेट अशा गावांबरोबरच तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी बाहेरच्या मंडळींनी व्यापल्याचे सांगितले जाते. या सर्वच परिसरात आलिशान फार्म हाऊसबरोबरच फ्लोटिंगची कामे सुरू आहेत. त्यापैकी कितीजणांनी परवानगी घेतली, हा संशोधानाचाच प्रश्न आहे. स्थानिक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीचे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे; पण दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न आहे. फार्म हाऊसला विरोध नाही; पण शेतीला मारक कचरा शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. अनेक फार्म हाऊसच्या शेजारच्या शेतीत पीक घेणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. कारण तेथील वर्दळ, प्लास्टिकपासून काचेच्या बाटल्यांपर्यंतचा कचरा यामुळे शेती नापीक होऊ लागली आहे. तलाठ्यांचा दणका तालुक्यातील चार ठिकाणी तलाव असूनही अणदूर गावकामगार तलाठ्यांनी पंधरा बेकायदेशीर बांधलेल्या घरांबाबत दि. ०७/०४/२०१७ ला तहसील कार्यालयात अहवाल पाठवून बेकायदेशीर घरे बांधल्याचे उघडकीस आणले आहे. त्यामुळे तहसील विभागाने त्यांना नोटीस दिल्या आहेत. अणदूर तलाठी हे करू शकतात, तर बाकी तीन ठिकाणी तलावाभोवती बांधकाम असणाऱ्या गावांतील गावकामगार तलाठी का करू शकत नाहीत?