शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

जिल्हा परिषदेच्या ४६ जागांवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:53 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या बाराही तालुक्यांमध्ये ३ हजार ८३७ मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले असून, यातील ४६ मालमत्तांवर अतिक्रमण झाल्याचे ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या बाराही तालुक्यांमध्ये ३ हजार ८३७ मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले असून, यातील ४६ मालमत्तांवर अतिक्रमण झाल्याचे उघडकीस आले आहे. मालमत्ता नोंदीसाठी सामान्य प्रशासन विभागाने उघडलेल्या खास मोहिमेअंतर्गत ही बाब स्पष्ट झाली आहे.जिल्हा परिषदेच्या मालमत्तांची एकत्रित माहितीच जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नव्हती. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रविकांत आडसूळ यांनी कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी या सर्व मालमत्तांची आनलाईन नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेले महिनाभर जिल्ह्यात या मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू होते.याची आकडेवारी उपलब्ध झाली असून, राधानगरी तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ७०८ जिल्हा परिषदेच्या मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याखालोखाल शिरोळ तालुक्यामध्ये ५०४ मालमत्ता असून, तिसऱ्या क्रमांकावर पन्हाळा तालुक्यामध्ये मालमत्ता आहेत. यामध्ये गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावावरील मालमत्तांचा समावेश आहे. आरोग्य विभागाची प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभागाच्या इमारती, महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाड्या, शिक्षण विभागाच्या शाळा, सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन दवाखाने या इमारतींचा समावेश आहे.ही अतिक्रमणे हटविण्यासाठीही मोहीम हाती घेणार आहे.उघड झालेली अतिक्रमणांची तालुकावार संख्या अशीजिल्ह्यामध्ये २००० प्राथमिक शाळा असल्या तरी काही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असल्याने त्यांचा समावेश या आकडेवारीमध्ये झालेला नाही. तालुकावार मालमत्ता -शाहूवाडी ११८, पन्हाळा ४६६, हातकणंगले २६६, शिरोळ ५०४, करवीर ३६१, गगनबावडा ६३, राधानगरी ७०८, चंदगड २२९, कागल ३१८, भुदरगड २४२, आजरा २८४, गडहिंग्लज २७८.