शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणी नसलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन नाही : उपजिल्हा निवडणूक अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 16:50 IST

आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांची नांवे मतदार यादीत समाविष्ट असणे बंधनकार आहे. ज्यांनी आपले नावे नोंदविलेली नाहीत, अशा अधिकारी,कर्मचारी यांचे वेतन जिल्हा कोषागार शाखा यांच्याकडून मंजूर केले जाणार नाही असा इशारा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांनी शनिवारी येथे दिला.

ठळक मुद्देमतदार नोंदणी नसलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन नाही उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांचा इशारा

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांची नांवे मतदार यादीत समाविष्ट असणे बंधनकारक आहे. ज्यांनी आपले नावे नोंदविलेली नाहीत, अशा अधिकारी,कर्मचारी यांचे वेतन जिल्हा कोषागार शाखा यांच्याकडून मंजूर केले जाणार नाही असा इशारा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांनी शनिवारी येथे दिला.भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीत नांव नोंदणीसाठी पात्र किंवा अद्यापही मतदार यादीत नांव समाविष्ट नसलेल्या सर्व पात्र नागरिकांची नोंदणी करण्यात येत आहे. जिल्हयातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी,कर्मचारी यांची नांवे मतदार यादीत समाविष्ट असणे अनिवार्य आहे. त्यासाठी संबंधितांनी नांवे मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत याची खात्री करावी.

तसेच अद्यापही मतदार यादीत नांव समाविष्ट नसलेल्यांनी नमुना क्रमांक ६ (कागदपत्रासह) भरावा किंवा आयोगाने विकसित केलेल्या संकेतस्थळावर आॅनलाईन पध्दतीने सादर करण्यात यावा. त्यानंतर त्यांनी सादर केलेला अर्ज संबंधित तालुक्यातील तहसिल कार्यालयास (निवडणूक शाखा) किंवा संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे आवाहनही उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर