शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारीवरील कर्मचारी अडचणीत

By admin | Updated: September 17, 2014 23:49 IST

प्रशासकांच्या नोटिसीवरील स्थगिती उठवली : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील भरती प्रकरण

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील ३७ रोजंदारी कर्मचारी अडचणीत आले आहेत. प्रशासकांच्या ‘कारणे दाखवा नोटिसी’ला जिल्हा औद्योगिक न्यायालयाने दिलेली स्थागिती आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने उठविली. बाजार समितीने औद्योगिक न्यायालयाच्या स्थगिती विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. समितीच्या बरखास्त संचालक मंडळाने पणन संचालकांची परवानगी न घेता ३७ कर्मचाऱ्यांची रोजंदारीवर भरती केली होती. ही बेकायदेशीर भरती असून, त्यांना कमी करण्याचे आदेश प्रशासक डॉ. महेश कदम यांना दिले होते; पण त्यांनी कारवाई केली नव्हती. पणन संचालक डॉ. सुभाष माने हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, याबाबत बाजार समितीचे माजी संचालक नंदकुमार वळंजू यांनी थेट तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे आदेश दिले होते. डॉ. कदम यांनी त्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली. या नोटिसीचा आधार घेत कर्मचाऱ्यांनी प्रथम वर्ग कामगार न्यायालयात याचिका दाखल केली; पण न्यायालयाने याचिका फेटाळून लावत प्रशासकांची नोटीस कायम केली. या निकालाविरोधात कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली. या न्यायालयाने प्रशासकांच्या नोटिसीला स्थगिती देत निकाल लागेपर्यंत कामावर ठेवण्याचे आदेश दिले होते. या स्थगितीविरोधात बाजार समितीचे प्रशासक व सचिवांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत समितीचे माजी रोजंदारी कर्मचारी संजय बाबगोंडा पाटील व प्रदीप आडसूळ यांनी ‘थर्ड पार्टी’ म्हणून आपले म्हणणे घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती. ती मान्य करत आज त्यावर सुनावणी झाली. औद्योगिक न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवत प्रशासकांनी दिलेल्या नोटिसीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे समजते. त्याचबरोबर याबाबत ‘थर्ड पार्टी’ म्हणून दाखल झालेल्या याचिकेवर दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे. याबाबत न्यायालयाच्या निकालाची अधिकृत प्रत उपलब्ध झालेली नाही. (प्रतिनिधी) अवमान याचिका दाखल करून्यायालयाच्या आदेशानुसार समितीच्या अशासकीय मंडळाने कर्मचाऱ्यांना कमी केले नाही, तर अवमान याचिका दाखल करू. त्याचबरोबर याबाबत जिल्हा उपनिबंधक व पणन संचालकांना निवेदन देणार असल्याचे समितीचे माजी संचालक नंदकुमार वळंजू यांनी सांगितले. अशासकीय मंडळाची कोंडी!प्रशासकांनी थेट कारवाईचे हत्यारच उपसल्याने राजकीय मंडळींनी त्यांना हटवून आपल्या मर्जीतील अशासकीय मंडळ आणले. त्यांनी पदभार घेतल्यापासून रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी दबाव आहे. न्यायालयीन बाब असल्यानेत्याला काँग्रेसच्या सदस्यांनी विरोध केला होता; पण आता न्यायालयाचा निकाल लागल्याने सदस्यांची कोंडी होणार आहे.