शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

कर्मचाऱ्यांच्या ५० जागा गोठवल्या

By admin | Updated: September 21, 2015 00:34 IST

बाजार समिती : आस्थापनाचा खर्च कमी करण्यासाठी ‘पणन’चे आदेश : नेत्यांसह संचालकांचे मनसुबे उधळले

राजाराम लोंढे-कोल्हापूर --- शेती उत्पन्न बाजार समितीचा आस्थापना खर्च जास्त असल्याने स्टापिंग पॅटर्न करण्याचे आदेश पणन संचालकांनी दिले आहेत. स्टापिंग पॅटर्नमधील ५० जागा गोठवल्या असून, १४५ कर्मचाऱ्यांचाच आता स्टापिंग पॅटर्न राहणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर जम्बो नोकरभरती करण्याचा मानस घेऊन सत्तेवर आलेल्या नेत्यांसह संचालकांचे मनसुबे उधळले आहेत. बाजार समितीचा सध्या १९५ कर्मचाऱ्यांचा स्टापिंग पॅटर्न आहे. त्यापैकी १३७ कर्मचारी विविध विभागांत कार्यरत आहेत. समितीच्या कर्मचाऱ्यांना निमशासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा असल्याने त्यांना गलेलठ्ठ पगार आहेत. त्यामुळे बाजार समितीमधील नोकरी म्हणजे प्रतिष्ठेची बनल्याने अनेकांच्या नोकरीसाठी उड्या असतात. बाजार समितीचे उत्पन्न व कर्मचाऱ्यांवर होणारा पगार यांचा ताळमेळ बसत नाही. आस्थापनाचा खर्च हा ४७ टक्के आहे. पणन मंडळाच्या नियमानुसार हा खर्च जास्तीत जास्त ४५ टक्क्यांपर्यंत असणे गरजेचे आहे. मागील संचालकांनी बाजार समितीत ४१ जणांची जम्बो नोकरभरती केली होती. संचालकांमध्ये वाटणीवरून वाद झाल्यानंतर चार कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. प्रत्यक्षात ३७ कर्मचारीच कामावर राहिले; पण याविरोधात नंदकुमार वळंजू यांनी न्यायालयात तक्रार केली. हे प्रकरण समितीमध्ये तब्बल दीड वर्षे गाजले. रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी प्रोसीडिंग गायब होण्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले होते. तोपर्यंत ‘पणन’ने कारभारावर ठपके ठेवत संचालक मंडळ बरखास्त केले, त्यानंतर प्रशासक आले आणि तेही दहा महिन्यांत गेले. शेवटच्या टप्प्यात अशासकीय मंडळ आले. या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी नेत्यांचा अशासकीय मंडळावर दबाव होता. रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्याने पेच निर्माण झाला होता. कर्मचाऱ्यांना कायम करण्यावरून अशासकीय मंडळात मतमतांतर होते. वाद मिटेपर्यंत अशासकीय सदस्यच पायउतार झाले. त्यानंतर प्रशासक म्हणून आलेले रंजन लाखे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना रितसर कमी केले. त्यानंतर बाजार समितीची निवडणूक झाली आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य मित्रपक्षांची सत्ता आली. सत्तेवर येताच कमी केलेल्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. तोपर्यंत पणन संचालकांनी बाजार समितीचे उत्पन्न व कर्मचाऱ्यांच्या पगारावरील खर्च याचा ताळमेळ पाहून ५० जागा गोठवण्याचे आदेश दिले. आता बाजार समितीचा स्टापिंग पॅटर्न १९५ ऐवजी १४५ झाला आहे. सध्या १३७ कर्मचारी कार्यरत असल्याने नव्याने नोकरभरती करण्यास संचालकांना संधी मिळणार नाही. त्यामुळे नेत्यांसह संचालकांचे नोकरभरतीचे मनसुबे उधळले आहेत. अशी आहे कर्मचाऱ्यांची संख्याउपसचिव - २सहायक सचिव - ७निरीक्षक - १२वरिष्ठ लिपिक - २२कनिष्ठ लिपिक - २५शिपाई - १२अभियंता - १बांधकाम पर्यवेक्षक - १वायरमन - १सुरक्षा अधिकारी - १उपसुरक्षा अधिकारी - १वॉचमन - ४५मजूर - ५ड्रायव्हर - २