शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

इचलकरंजी, पेठवडगाव तालुक्यांसाठी जोर

By admin | Updated: May 14, 2015 00:34 IST

प्रशासकीय कामासाठी गैरसोय थांबवा : ब्रिटिश काळात राबविण्यात आलेला तालुका पॅटर्न हातकणंगले तालुक्यासाठी कालबाह्य

दिलीप चरणे - नवे पारगाव ब्रिटिश काळात राबविण्यात आलेला तालुका पॅटर्न आता हातकणंगले तालुक्यासाठी कालबाह्य झाला आहे. प्रशासकीय कामासाठी जनतेची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी हातकणंगलेचे विभाजन करून पेठवडगाव व इचलकरंजी हे दोन तालुके व्हावेत, अशी मागणी सन २००० पासून जोर धरत आहे. गेल्या १५ वर्षांत तालुक्याची वाढ व विस्तार झपाट्याने झाला. त्यामुळे हातकणंगलेचे विभाजन होऊन नियोजित पेठवडगाव तालुक्यासाठी परिसरातील गावांचा व नियोजित इचलकरंजी तालुक्यात इचलकरंजी सभोवतीच्या गावांचा समावेश होऊन विभाजन व्हावे.वारणेजवळील निलेवाडी ते हुपरीजवळची जंगमवाडी ही हातकणंगले तालुक्याची दूरची टोके आहेत. हातकणंगले तालुक्याची लोकसंख्या वाढली तसा प्रशासकीय कामांचा ताणही वाढत गेला आहे. वाढलेली गर्दी व उपलब्ध साधनसामग्री, मनुष्यबळ यांचा ताळमेळ लागत नसल्याने जनतेच्या कामाचा निपटारा वेळेत होत नाही.जनतेला प्रशासकीय कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. परिणामी, लोकांचे आर्थिक नुकसान होऊन वेळही वाया जातो. कामे वेळेत करून घेण्यासाठी लोक शॉर्टकट शोधू लागले. त्यातून भ्रष्टाचार वाढू लागला. यामुळे जनता वैतागली असून, तालुका विभाजनाच्या मागणीला बळ मिळू लागले आहे.पेठवडगाव तालुका निर्मिती करताना जयसिंगपूर-शिरोली- कोल्हापूर या मुख्य रस्त्याच्या उत्तर बाजूकडील सर्व गावे, पन्हाळा तालुक्याची पूर्वीचीच हद्द, वारणा नदीपर्यंत उत्तरेची हद्द व करवीर तालुक्याची पूर्वीची हद्द असा असावा. नियोजित पेठवडगाव तालुक्यामध्ये निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव, तळसंदे, चावरे, किणी, घुणकी, वाठार, अंबप, अंबपवाडी, पाडळी, मनपाडळे, टोप, नागाव, शिरोली, नरंदे, उदगाव, खोची, भेंडवडे, लाटवडे, भादोले, पेठवडगाव, आदी गावांचा समावेश असावा. नियोजित इचलकरंजी तालुक्यामध्ये जयसिंगपूर-शिरोली- कोल्हापूर या मुख्य रस्त्याच्या दक्षिणेकडील सर्व गावे, करवीर तालुक्याची पूर्वीचीच हद्द, शिरोळ व कागल तालुक्याची पूर्वीचीच हद्द ठेवून तालुका व्हावा. यामध्ये हालोंडी, चोकाक, माणगाव, रुकडी, कोरोची, साजणी, नीळवणी, शहापूर, रुई, कबनूर, इचलकरंजी, पट्टणकोडोली, इंगळी, चंदूर, हुपरी, रेंदाळ, तळंदगे, रांगोळी, तारदाळ, यळगूड, जंगमवाडी, आदी गावांचा समावेश असावा. (क्रमश:)हातकणंगले तालुका विभाजन