शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अत्यवस्थ रुग्णांना सर्वप्रथम दाखल करून उपचार करावेत : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:31 IST

खासगी वैद्यकीय रूग्णालयांनी अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करावेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना त्याबाबत सूचना द्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्दे अत्यवस्थ रुग्णांना सर्वप्रथम दाखल करून उपचार करावेत : मुश्रीफ जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडबाबत आढावा बैठक

कोल्हापूर : खासगी वैद्यकीय रूग्णालयांनी अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करावेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना त्याबाबत सूचना द्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री मुश्रीफ यांनी कोविड-१९ बाबत आढावा बैठक घेतली.

या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रमुख उपस्थित होते. खासगी रूग्णालयांमध्ये रूग्णांना बेड उपलब्ध करून देण्याबाबत अधिकारी नेमावेत. नागरिकांनी विशेषत: ग्रामीण भागात मास्क न वापरणाऱ्यांवर पोलीसांनी सतर्क राहून कारवाई करावी.

अत्यवस्थ रूग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील काही रूग्णालये अधिग्रहित करता येतील का याबाबत नियोजन करा. त्याचबरोबर अत्यवस्थ रूग्णांसाठी नवीन यंत्रांची माहिती घेऊन त्याच्या उपयुक्ततेबाबतही माहिती घ्यावी आणि ते मागविण्याबाबत नियोजन करावे. रूग्णांना वाचविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू.

सीपीआरमध्ये क्षमता वाढविण्यासाठी तयारी करा. ग्रामीण भागातील कोविड केंद्रांवर मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास सीपीआरवर वाढणारा ताण कमी होईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, आदी उपस्थित होते.ऑक्जिजन टँक बसविण्याची सूचनाप्रत्येक सीसीसीमध्ये एक्सरे काढून त्याबाबतचा अहवाल देण्यासाठी बाह्ययंत्रणा नेमण्यात येत आहे. नॉन ऑक्सिजन बेडसाठी जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा करण्यात येत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन टँक बसविण्याबाबतची सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी अधिष्ठाता यांना दिली.लक्षणे दिसताच स्वॅब तपासून उपचार घ्यावेतअद्यापही रूग्ण अंगावर काढत आहेत आणि अत्यवस्थ झाल्यानंतर उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे मृत्यू होत आहेत. रूग्णांनी लक्षणे दिसताच स्वॅब तपासणी करण्यासाठी पुढे यावे. तत्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHasan Mushrifहसन मुश्रीफcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर