शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांचा जानेवारीत पुन्हा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लाखोंच्या संख्येने मोर्चे काढूनही मराठा समाजाची कोणतीही मागणी सरकारने मान्य केलेली नाही; त्यामुळे सरकारला धडकी भरविण्यासाठी जानेवारी महिन्यात कोल्हापुरातील गांधी मैदानावर पश्चिम महाराष्टÑातील मराठ्यांची विराट सभा घेण्याचा निर्णय रविवारी येथे घेण्यात आला. सरकारने मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता लवकरात लवकर मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, असा इशारा मराठा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लाखोंच्या संख्येने मोर्चे काढूनही मराठा समाजाची कोणतीही मागणी सरकारने मान्य केलेली नाही; त्यामुळे सरकारला धडकी भरविण्यासाठी जानेवारी महिन्यात कोल्हापुरातील गांधी मैदानावर पश्चिम महाराष्टÑातील मराठ्यांची विराट सभा घेण्याचा निर्णय रविवारी येथे घेण्यात आला. सरकारने मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता लवकरात लवकर मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, असा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला.मराठा क्रांती मूक मोर्चाला रविवारी वर्षपूर्ती झाली. या मोर्चाचे फलित काय, याचा ऊहापोह करून पुढील दिशा ठरविण्यासाठी मराठा महासंघातर्फे शाहू स्मारक भवन येथे मराठा जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, प्राचार्य शिवाजी भुकेले, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, प्रा. विद्या साळोखे, व्ही. के. पाटील, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, उत्तम जाधव, प्रदीप पाटील, सुनील पाटील, दत्ता पाटील, डॉ. संदीप पाटील, आदींची होती.मेळाव्यात जिल्ह्याच्या कानाकोपºयातून आलेल्या मराठा बांधवांनी सरकारविरोधात ‘मूक मोर्चा नको, ठोक मोर्चा’ काढूया अशा भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर इंद्रजित शिरगावकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर जाऊन वसंतराव मुळीक यांना तलवार भेट देऊन ‘आरक्षण मिळाल्याशिवाय तलवार म्यान करायची नाही,’ अशी मागणी केली. लाखोंचे मोर्चे निघूनही समाजाची कोणतीही मागणी सरकारने मान्य केलेली नाही. त्यामुळे शासनावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल करीत सरकारने मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा वसंतराव मुळीक यांनी दिला. मराठ्यांच्या मागण्यांसंदर्भात समाजाच्या भावना लक्षात घेऊन जानेवारी महिन्यात कोल्हापुरातील गांधी मैदानावर पश्चिम महाराष्टÑाची विराट सभा घेण्याचे मुळीक यांनी जाहीर केले. या कालावधीत सरकारने मागण्यांबाबत लवकर निर्णय घ्यावा, असे सांगत मागण्या मान्य झाल्याशिवाय तलवार म्यान करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.सतेज पाटील म्हणाले, मराठा मूक मोर्चाचा आवाज बहुधा सरकारच्या कानांवर गेलेला दिसत नाही. त्यामुळे तेव्हा जर घोषणांचे मोर्चे काढले असते तर या सरकारचे कान बधिर होऊन काहीतरी निर्णय झाला असता. शांततेच्या मार्गाने आम्हाला यश मिळेल असे वाटत होते; परंतु हे कलियुग आहे; त्यामुळे शांत राहून चालणार नाही. आपल्याला संघर्ष करावा लागेल. राजेश क्षीरसागर म्हणाले, या सरकारला आरक्षण द्यायचे नसेल तर जाट, गुर्जर, राजपूत यांच्याप्रमाणे मराठ्यांना पेटून उठावे लागेल. सरकारला आरक्षण द्यायचे असते तर आतापर्यंत दिले असते.यावेळी मारुती मोरे, दत्ता पाटील, रविराज निंबाळकर, चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.तेलही गेले, तूपही गेलेप्राचार्य भुकेले म्हणाले, सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत जेवढ्या घोषणा केल्या, त्याचे फलित म्हणजे ‘तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले,’ असे आहे.