शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
4
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
5
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
6
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
7
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
8
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
9
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
10
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
12
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
13
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
14
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
15
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
16
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
17
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
18
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
19
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
20
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या

कवठेएकंदला १२ तास आतषबाजीने डोळे दिपले

By admin | Updated: October 24, 2015 00:23 IST

नयनरम्य दारुकाम : श्री सिद्धराजाचा पालखी सोहळा उत्साहात; पोलीस यंत्रणा, प्रशासनाला सहकार्य

प्रदीप पोतदार-कवठेएकंद -श्री सिद्धराजाच्या पांढरीत भाविकांची जमलेली गर्दी, गर्दीतून उमटणारा ‘हर, हर..’चा गजर, डोळे दीपविणारी आतषबाजी आणि बेभानपणे चमकत्या ठिणग्यांच्या वर्षावात नाचणे अशा उत्साही आणि जल्लोषी वातावरणात ग्रामदैवतश्री सिद्धराजाचा पालखी सोहळा साजरा झाला. तब्बल १२ तास रंगीबेरंगी आतषबाजीचा झालेला नजराणा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. पोलीस यंत्रणा, प्रशासन आणि यात्रा कमिटीच्या संयोजनाला गावकऱ्यांनी चांगली साथ देत सुरक्षित व विनाअपघात दसरा उत्सव पार पाडून आदर्श नोंदविला. रात्री ८.१५ वाजता श्री मंदिरात पूजाअर्चा होऊन पालखी सोहळ्यास हजारो औटांची सलामी दिली. बिरदेव मंदिर परिसरातील शिलंगण चौकात चव्हाण पाटील कट्ट्यावर मानकऱ्यांच्या उपस्थितीत सोनं (आपट्याची पानं) लुटण्याचा कार्यक्रम झाला. श्री सिद्धराजांची पूजाअर्चा होऊन ग्रामप्रदक्षिणेस श्री बिरदेवाच्या पालखीसह प्रारंभ झाला. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या आतषबाजीची सलामी घेत पालखी पुढे-पुढे सरकत होती. रात्र चढेल तसा आतषबाजीच्या नानाविध प्रकारांनी पालखी सोहळ्याचा रंग अधिकत चढत होता. लाकडी शिंगाडांचे चमकते अग्निफवारे, खांद्यावर अवकाशात फुटणाऱ्या औटांची बरसात, कागदी शिंगाडांचे दरारे, बुरुज, फुगडी, दाणपा धबधबे अशा पारंपरिक, नानाविध प्रकारांमुळे आतषबाजी करताना यात्रेकरूंची वाहवा मिळवून गेली. १२ तास आसमंत उजळून टाकणारा पालखी सोहळा रंगला.ग्रामप्रदक्षिणेच्या मुख्य मार्गावर यात्रा कमिटीने नेटके नियोजन करून सुरक्षित सोहळ्यासाठी प्रयत्न केले. पालखी पुढे पुढे सरकत असताना गर्दीचा उत्साह वाढेल तसा आतषबाजीचा नजराणा अधिकच खुलत होता. भक्ती आणि कलेच्या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. श्री सिद्धराजाच्या पालखीसमवेत सजवलेला रुबाबदार अश्व, आरती-दिवटी, छत्र, चामर, सनई अशा दिमाखात पालखी सोहळ्यासाठी गावा-गावाहून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शन घेतले. रात्रभर चमकत्या ठिणग्यांच्या वर्षावात आतषबाजीचा आनंद लुटला. दारोदारी सुहासिनींनी पालखीस ओवाळून दर्शन घेतले. ग्रामप्रदक्षिणा पूर्ण होऊन श्री पालखी देवधरे येथे मानाच्या घरी श्रीची भेट होऊन पूजाअर्चा झाली. त्यावेळी सकाळ होऊन पालखी परत पळवत श्री मंदिरात येऊन सांगता होते.जवळपास १२ ते १३ तास पालखी सोहळ्याचा कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला. पालखीसोबत गुरव, पुजारी, मानकरी चव्हाण, पाटील, सेवेकरी डवरी, गोंधळी, विविध जाती-धर्माचे पूर्वापार सेवक मंडळी, भाविक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रीबाण बंदीमुळे धोके टळलेयात्रेदिवशी आकाशात सोडलेला पत्री बाण डोक्यात पडल्याने अनेकजण जखमी होत होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून पत्री बाण करणे ग्रामस्थांनी बंद केल्याने यात्रेकरूंना सर्वत्र बिनधास्तपणे वावरता येत होते. बाण नसल्याने इकडून तिकडे ठिणगी पडण्याचे प्रकार थांबल्याने धोके टळले.चोख व्यवस्थाप्रांताधिकारी सुभाष बोरकर, तहसीलदार सुधाकर भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात्रा सुरक्षिततेबाबत केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. गावातील चौका-चौकात तलाठी, मंडल अधिकारी, पोलीस यंत्रणेसह आरोग्य विभाग, विद्युत कंपनीचे पदाधिकारी, सेवक तैनात होते. तातडीची सेवा म्हणून आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या उपस्थित होत्या.