शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात हत्ती-गव्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:45 IST

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा तालुक्यात यावर्षी मुसळधार पावसातच हत्ती आणि गव्यांचा जोर वाढला आहे. अतिवृष्टीसदृश झालेल्या पावसातच हत्ती व गव्यांनी धुमाकुळीचा जोर धरल्याने तीन महिन्यांत अपरिमित असे शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.तब्बल ३५ वर्षांपासून गव्यांचा धुमाकूळ सुरू आहे. गवे वर्षानुवर्षे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून शेतकºयांचे कंबरडे ...

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा तालुक्यात यावर्षी मुसळधार पावसातच हत्ती आणि गव्यांचा जोर वाढला आहे. अतिवृष्टीसदृश झालेल्या पावसातच हत्ती व गव्यांनी धुमाकुळीचा जोर धरल्याने तीन महिन्यांत अपरिमित असे शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.तब्बल ३५ वर्षांपासून गव्यांचा धुमाकूळ सुरू आहे. गवे वर्षानुवर्षे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून शेतकºयांचे कंबरडे मोडत आहेत. १३ वर्षांपूर्वी हत्तीचे आगमन होऊन हत्तीपासून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.गेल्या तीन दशकात प्रथमच यंदा जून ते आॅगस्टअखेर सलग तीन महिने पावसाने धुमाकूळ घालून तालुक्यातील शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळविण्याबरोबर ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात न येणारे गवे पावसातच पिकांची नासधूस करत आहेत. १३ वर्षांत पावसाळ्यात दर्शन न देणाºया हत्तीने यावर्षी मुसळधार पाावसात पिकांची धुलाई केली आहे.पावसामुळे पिकांचे नुकसान होत असतानाच हत्ती आणि गव्यांनीही धुमाकुळीचा जोर धरला. त्यामुळे पश्चिम भागातील मसोली, हाळोली, देवर्डे, वेळवट्टी, पेरणोली, कोरीवडे, गवसे, दाभिल, शेळप, आंबाडे, किटवडे, घाटकरवाडी आदी गावांत प्रामुख्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तीन महिन्यांत शेतकºयांचे पिकांचे नुकसान हत्ती व गव्यांनी केले आहे.शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचितपश्चिम भागांतील विशेषत: मसोली, हाळोली, वेळवट्टी या परिसरात हत्तीने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. पेरणोली, देवर्डे, नावलकरवाडी, दाभिल, गवसे, आंबोड, किटवडे परिसरात गव्यापासून मोठे नुकसान झाले असताना अद्याप पंचनामा झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहेत.नागरी वस्तीत सांबरवेळवट्टीनजीक दोनवेळ सांबराचे दर्शन झाले. हत्ती, गव्यानंतर आता सांबरही नागरी वस्तीजवळ आले आहे. सांबर बिथरलेले किंवा जखमी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वनविभागाने त्याची देखभाल करून पुन्हा जंगलात सोडण्याची मागणी होत आहे.