शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांचा ८ जानेवारीला देशव्यापी संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 14:31 IST

केंद्र सरकारच्या सुधारित विद्युत कायद्याच्या निषेधार्थ वीज उद्योगातील कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये असंतोष उफाळला असून, येत्या ८ जानेवारीला देशव्यापी संप पुकारून या असंतोषाला मोकळी वाट करून दिली जाणार आहे.

ठळक मुद्देवीज कर्मचाऱ्यांचा ८ जानेवारीला देशव्यापी संपमोहन शर्मा यांची माहिती : केंद्र सरकारच्या खासगीकरणाचा निषेध

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या सुधारित विद्युत कायद्याच्या निषेधार्थ वीज उद्योगातील कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये असंतोष उफाळला असून, येत्या ८ जानेवारीला देशव्यापी संप पुकारून या असंतोषाला मोकळी वाट करून दिली जाणार आहे.

यासंदर्भात येत्या बुधवारी (दि. १३) नवी दिल्लीत वीज उद्योगातील प्रमुख अधिकारी, कर्मचारी संघटना प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंदोलनाची अंतिम रूपरेषा ठरवली जाणार आहे, अशी माहिती आॅल इंडिया फेडरेशन आॅफ इलेक्ट्रीसिटी एम्प्लॉईजचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी कोल्हापुरात दिली.महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील सर्वांत पहिली व सर्वांत मोठी संघटना असलेल्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन पुरस्कृत स्वाभिमानी वीज कामगार या मुखपत्रास ५0 वर्षे पूर्ण झाली आहेत.

यानिमित्ताने कोल्हापुरात रविवारी (दि. १0) दुपारी अडीच वाजता हुतात्मा पार्क येथील सभागृहाजवळ सुवर्णमहोत्सवी सोहळा आयोजित केला आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी शर्मा हे शुक्रवारी कोल्हापुरात आले होते. त्यांच्यासमवेत संघटनेचे महेश जोतराव, कृष्णा भोयर, सी. एन. देशमुख, मा. वी. जोगळेकर यांची उपस्थिती होती.शर्मा म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे वीज उद्योगच मोडकळीस आला असून, सरकारचा सहभाग संपून त्याची जागा खासगीकरण घेत आहे. मोठ्या प्रमाणावर कंत्राटीकरण व आऊटसोर्सिंगला वाव दिला जात असल्यामुळे, आहे त्या नोकऱ्या टिकविणे अवघड होऊन बसले आहे.

येत्या काही महिन्यांत राज्यातील २५ हजार कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. भाटिया आणि रानडे कमिटीच्या शिफारशी मान्य करण्याचे ठरवूनदेखील राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही; त्यामुळे कंत्राटी म्हणून नियुक्त झालेला कर्मचारी निवृत्तही कंत्राटीच म्हणून होत आहे.

केंद्राच्या विद्युत कायद्यानुसार वीजेची विक्री व वसुलीचे सर्वाधिकार खासगी कंपन्यांना दिले जाणार असल्याने देशभरातील लाखो कर्मचारी, अधिकारी, अभियंते नोकऱ्यांना मुकणार आहेत. सरकारचा हा डाव हाणून पाडण्यासाठी देशभरातील सर्व वीज उद्योगांतील कर्मचारी एकवटले असून, त्याला सामूहिक विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.पूरग्रस्तांना १0 लाखांचा निधीवीज कर्मचारी संघटनेने कोल्हापूर व सांगलीमध्ये आलेल्या महापुरातील बाधितांना मदतीचा हात म्हणून १0 लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तो मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाणार आहे. कर्मचारी संघटनेने कायमच सामाजिक बांधीलकी जपली आहे. शिवाजी विद्यापीठातील दत्ता देशमुख अध्यासन केंद्र व नागपूर विद्यापीठातील ए. बी. वर्धन अध्यासन केंद्रालाही प्रत्येकी १0 लाखांचा निधी दिला आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर