शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’ची गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 15:08 IST

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ‘महावितरण’कडून सवलतीच्या व वहन आकारासह मात्र ४ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट वीजदराने तात्पुरती वीजजोडणी देण्यात येणार आहे. तरी मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे‘महावितरण’ची गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीजअधिकृत वीजजोडणीचे ‘महावितरण’चे आवाहन

कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ‘महावितरण’कडून सवलतीच्या व वहन आकारासह मात्र ४ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट वीजदराने तात्पुरती वीजजोडणी देण्यात येणार आहे. तरी मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन (व्हीलिंग) आकार असे वीजदर आहेत. या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात वीज वापरली तरीही शेवटच्या युनिटपर्यंत केवळ ४ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट एवढाच दर आकारण्यात येईल.

गणेश मंडळांना प्राधान्याने वीजजोडणीसाठी सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले असून, वीजभार ०.५ किव्होकरिता एक हजार रुपए वीजजोडणी खर्च आकारण्यात येईल. मंडळाच्या वीजभारानुसार सुरक्षा ठेव रक्कम आकारण्यात येईल. उत्सवानंतर ही रक्कम मंडळाच्या खात्यात महावितरणकडून आॅनलाईनद्वारे परतावा करण्यात येईल.वीजयंत्रणेची काळजी घ्याया कालावधीत पावसाचे संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मंडळांनी मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत.

विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. मंडपातील वीजयंत्रणेची दैनंदिन तपासणी करण्यात यावी. तातडीच्या मदतीसाठी १९१२ किंवा १८००१०२३४३५ या महावितरणच्या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर