शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

भरतीसाठी वीज कंत्राटी कामगार संघाची उच्च न्यायालयात धाव

By संदीप आडनाईक | Updated: May 18, 2024 14:08 IST

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरतीमध्ये कुशल आणि अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना वयात सवलत दिली जाईल, रानडे समितीच्या शिफारसीनुसार आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले होते.

कोल्हापूर : ऊर्जामंत्र्यांनी केलेल्या शिफारसीनुसार कंत्राटी कामगारांना वयात ४५ वर्षांपर्यंत सवलत आणि रानडे समितीच्या शिफारशींप्रमाणे आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.महावितरण कंपनीत इडब्ल्यूएस पात्र उमेदवार यांना १० टक्के जागा मिळणार होत्या, त्यानुसार हे अर्ज भरण्यासाठी सरकारने २० मेपर्यंत अंतिम मुदत वाढवली होती. आता पुन्हा औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांसाठी २० जून २०२४ पर्यंत ही मुदत प्रशासनाने वाढवली आहे. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरतीमध्ये कुशल आणि अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना वयात सवलत दिली जाईल, रानडे समितीच्या शिफारसीनुसार आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन ९ मार्च २०२४ रोजी नागपूर येथे संपाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करताना दिले होते.कुशल आणि १५ ते २० वर्षे अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना हे अर्ज भरण्यासाठी उपलब्ध लिंकमध्ये व्यवस्थापनाने कोणतेही बदल न केल्याने या कामगारांच्या हितार्थ वीज कंपनी प्रशासनाविरोधात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले.ऊर्जामंत्र्यांच्या सूचनेचा आदर करून वीज कंत्राटी कामगारांना ही संधी प्रशासनाने द्यावी यासाठी संघटनेने १६ एप्रिल रोजी पत्र दिले असून, ही भरती थांबवून योग्य निर्णय करावा, यासाठी पुन्हा संघटनेसोबत एक बैठक घेऊन भरतीबाबत आणि इतर समस्यांबाबतचा गैरसमज प्रशासनाने लवकर दूर करावा, अन्य समस्यांसाठी लवकरच मोठ्या आंदोलनाची रूपरेषा २६ मे रोजी कुडाळ येथील बैठकीत ठरवली जाणार असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नीलेश खरात यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmahavitaranमहावितरणHigh Courtउच्च न्यायालय