शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना वीज बिलाचा भुर्दंड

By admin | Updated: June 27, 2017 01:04 IST

वीज वितरण कंपनीची दंडुकशाही : शेती पंपाची सरासरी बिले आकारून वेठीस धरण्याचा प्रकार

दत्ता बिडकर ।  लोकमत न्यूज नेटवर्कहातकणंगले : तालुक्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना चुकीच्या वीज बिलासाठी वेठीस धरले जात आहे. ३ एचपीसाठी ९२७ वापर युनिट, तर ५ एचपीसाठी १५४५ वापर युनिट अशी शेतीपंपाची फिक्स सरासरी वीज बिले लागू करून शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. उन्हाळ्याच्या तीन महिन्यांमध्ये विहिरी कोरड्या असतानाही वीज बिले लागू केल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संताप व्यक्त होत आहे.वीज वितरण कंपनीच्या कुंभोज, रुकडी, हेरले, चोकाक उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वीस ते पंचवीस गावांमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना वीज मंडळाकडून मार्च ते मे या तीन महिन्यांची वीज बिले लागू केली असून, सर्व शेतकऱ्यांना तीन एचपीच्या शेती पंपासाठी ९२७ वापर वीज युनिटचे ८५० पासून ११५० पर्यंत वीज बिल आकारणी केली आहे. सरसकट शेतकऱ्यांना १५० पासून ३०० रुपयांपर्यंत भुर्दंड लावला आहे, तर ५ एचपीच्या वीज पंपासाठी १५४५ वापर युनिट वीज बिल आकारणी केली असून, सर्व शेतकऱ्यांना समान बिल आकारणी करण्याऐवजी या बिलामध्ये सरासरी २०० पासून ५०० पर्यंत बिल आकारणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीकडून कोणतेही प्रत्यक्ष मीटर न घेता गंडा घालण्याचे काम सुरू आहे.शेतकऱ्यांनी गेली सहा-सहा महिने आपली वीज मीटर बंद असल्याचे वीज वितरण कंपनीला लेखी कळविले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मीटरचे रीडिंग डिस्पले बंद असल्याचे कळविले आहे. अशा शेतकऱ्यांना वीज कंपनीकडून चुकीची वीज बिले लागू केली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांनी वीज कनेक्शन घेतेवेळी वीज मंडळाकडे सिक्युरिटी डिपॉझिट भरणा केलेली असते. या डिपॉझिटचे व्याज वर्षातून एकवेळ मार्चनंतरच्या वीज बिलामध्ये दिले जाते. मात्र, जिल्ह्यामध्ये फक्त हातकणंगले विभागाकडून गेल्या दोन वर्षांपासून व्याज दिले गेले नाही. मात्र, वीज मंडळ शेतकऱ्यांचे वीज बिल थकले की वीज तोडते. वहन, स्थिर आकार बेकायदेशीरवीज कंपनीकडून या बिलामध्ये नव्याने प्रतियुनिट १ रुपये २१ पैसे वहन आकार आणि महिन्याला २२ रुपये स्थिर आकार बेकायदेशीर लावण्यात आले आहेत. याबद्दलही शेतकऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.