शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

विद्युत खांब धोकादायक

By admin | Updated: July 18, 2014 23:25 IST

जयसिंगपूरच्या शाहूनगरमधील स्थिती : भररस्त्यात अडथळे, अपघातास निमंत्रण

संदीप बावचे -जयसिंगपूर लोकसंख्या वाढली, वाहनं वाढली, पण रस्ते तेवढेच राहिल्याने रस्त्याचा श्वास घुसमटला. यातच आणखी एक विचित्र अडथळा शहरातील शाहूनगर भागामध्ये समोर येत आहे. विजेचे तब्बल बारा खांब रस्त्याच्या मधेच उभे आहेत. हे खांब काढून भूमिगत वीजवाहिनी टाकण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र, ती रखडली असून विजेचे हे खांब एका बाजूस हलविण्याशिवाय कोणताही पर्याय सध्या नसल्याची बाब पुढे आली आहे. मात्र, हे खांब धोकादायक ठरत आहेत. शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून मुख्य दोन रस्त्याचे जोडरस्ते अधिक प्रमाणात उपयोगात आले आहेत. मात्र, शाहूनगर परिसरातील पटेल चौकातून जाणारा रस्ता सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण झाले; परंतु जुन्या खांबांनी आपली जागा सोडली नाही. रस्त्याची रुंदी अपुरी आहे. पटेल चौक ते नऊ नंबर शाळेकडे जाणाऱ्या या रस्त्यावर तब्बल बारा विजेचे खांब आहेत. अरुंद रस्त्यामुळे या मार्गावर विद्युत खांबाला डंपरने धडक दिल्यामुळे खांब कोसळण्याच्या घटना अनकेवेळा घडल्या असून काही खांब काहीसे वाकलेदेखील आहेत. रस्त्यात अडथळा ठरणारे हे खांब काढून ‘भूमिगत वीज प्रकल्प’ यामध्ये या रस्त्यावरील वीज खांबांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, ठेका मिळालेल्या कंपनीकडून या मार्गावरील वीजवाहिनी हलविण्याबाबतची प्रक्रिया वगळण्यात आल्याचे समजते. रात्रीच्या वेळी फसगत होऊन अपघातास निमंत्रण देणारे हे खांब काढण्याबाबत येथील नागरिकांची मानसिकता दिसत नाही. रस्त्याच्या मधोमध असणारे हे खांब एका बाजूला करण्याबाबत वीज कंपनी विभागाकडून येथील नागरिकांना सांगण्यात आले आहे. मात्र, हे खांब आपल्या बाजूला नकोतश, अशीही मानसिकता नागरिकांची आहे. एकूणच अपघातास निमंत्रण देणारे हे विद्युत खांब हलविण्याची गरज आहे. या प्रश्नी महावितरणशी संपर्क साधला असता शाहूनगर परिसरातील विद्युत खांब हलविण्यासाठी महावितरण विभाग तयार आहे. येथील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन खांब हलविण्याबाबत नागरिकांशी चर्चा करावी. महावितरणकडून कार्यवाही केली जाईल, अशी माहिती वीज वितरणचे अधिकारी विजय आडके यांनी दिली. खांब हलविण्याची गरज सध्या अस्तित्वात असणारे हे खांब अत्यंत धोकादायक बनले आहेत. वाढती लोकसंख्या याचा विचार आणि खासकरून या भागात डंपर व्यावसायिक वास्तव्यास आहेत. अपघातास धोकादायक असलेले विद्युत खांब वातुकीस अडथळा ठरत असल्याने एका बाजूला खांब घेण्याशिवाय पर्याय नाही. - अस्लम फरास, नगरसेवक जयसिंगपूर