शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांकडून निवडणुका ‘प्रतिष्ठे’च्या--सरपंच, उमेदवार चाचपणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:42 IST

जयसिंगपूर : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावपातळीवरच्या या निवडणुका केवळ नावापुरत्या मर्यादित राहिल्या नसून,

ठळक मुद्देशिरोळ तालुक्यामध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभगावातील वजनदार व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पॅनेल तयार करण्यासाठी सोयीचे इच्छुक उमेदवार निवडले जात आहेत

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावपातळीवरच्या या निवडणुका केवळ नावापुरत्या मर्यादित राहिल्या नसून, विविध राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. तालुक्यात १७ ग्रामपंचायतींच्या १६ आॅक्टोबरला सार्वत्रिक निवडणुका होत असून, सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुका प्रतिष्ठेच्या असल्याने सरपंच, उमेदवार चाचपणीला वेग आला आहे.शिरोळ तालुक्यात १७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुका कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्या, तरी थेट सरपंचपदामुळे ग्रामपंचायतीचा कारभार हाकणारा प्रतिनिधी आपल्याच पक्षाचा असावा आणि ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावे, यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. उद्या, शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. सध्या गावागावांत राजकीय पक्षांचे नेते चाचपणी करीत आहेत. गावातील वजनदार व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आघाड्या, पॅनेल तयार करण्यासाठी सोयीचे इच्छुक उमेदवार निवडले जात आहेत. परिणामी, राजकीय वातावरण तापू लागल्याने उमेदवार निश्चित झाले नसले तरी इच्छुकांनी मात्र तयारी सुरू केली आहे.‘सरपंच’ निवडीत राजकारण होणार?सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जनतेतून थेट सरपंच निवडीचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. सरपंचपदासाठी उमेदवाराची चाचपणीही केली जात आहे. सरपंचपदासाठी नवखा व अभ्यासू उमेदवार देण्यासाठी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी, शिवसेना यांसारख्या पक्षांनी उडी घेतली असून, थेट सरपंच निवड असल्याने गावाचा विचार करून उमेदवार देण्याबाबत विचार केला जात आहे. काही आघाड्यांकडून सरपंचपदाची नावे घोषित केली जात आहेत.संभाजीपूरची निवडणूक महत्त्वपूर्ण : तालुक्यातील ५३ वे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया संभाजीपूर ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. जयसिंगपूर शहरालगत असलेली ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी राजकीय मंडळींनी जोरदार तयारी चालविली आहे. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमानी यांनीही या निवडणुकीत लक्ष घातले आहे. गेल्या पाच वर्षांत सरपंचपदावरून झालेल्या घडामोडी लक्षात घेता, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.निवडणूक रणधुमाळीऔरवाड, कवठेसार, कनवाड, चिंचवाड, उमळवाड, संभाजीपूर, अकिवाट, अब्दुललाट, लाटवाडी, नवे दानवाड, टाकवडे, राजापूर, राजापूरवाडी, शिवनाकवाडी, हरोली, हेरवाड, खिद्रापूर या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.