शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जुलैमध्ये निवडणुकीचा धडाका

By admin | Updated: June 8, 2015 00:48 IST

हातकणंगले तालुका : २१ ग्रामपंचायतींच्या राजकीय घडामोडींना वेग

दत्ता बिडकर- हातकणंगले -हातकणंगले तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जुलै महिन्यात होण्याची शक्यता प्रशासकीय यंत्रणेने व्यक्त केली आहे. प्रभाग रचना आणि सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे तालुक्यातील चंदूर, कबनूर, माणगाव, तिळवणी, जंगमवाडी, माणगाववाडी, रुई, किणी, मनपाडळे, पाडळी, वाठार तर्फ वडगाव, खोची, लाटवडे, तासगाव, वाठार तर्फ उदगाव, मिणचे, हालोंडी, कुंभोज, नेज, दुर्गेवाडी, बिरदेववाडी या ग्रामपंचायतींच्या मुदती जुलै ते सप्टेंबर या कालावधीत संपत आहेत. दरम्यान, पावसाळा सुरू होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. यापूर्वी पुरेसा कर्मचारी वर्ग आणि पोलीस बंदोबस्ताचे कारण निवडणूक आयोगाने देत यापूर्वी जाहीर झालेला कार्यक्रम रद्द केला होता.तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या ९४ प्रभागांमधून २६१ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत. याकरिता एक लाख १६ हजार ७५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षण आणि सरपंच आरक्षण जाहीर केल्यामुळे गावा-गावांमध्ये निवडणूक चर्चेला उधाण आले आहे. ग्रामपंचायत निवडणुका जवळ आल्याने प्रत्येक गट-तट रणनिती आखण्यात व्यस्त आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या भूमिका घेणारे नेते ग्रामपंचायतीसाठी स्थानिक आघाड्यांचे राजकारण करून सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. याची समीकरणेही बदलली आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे उट्टे काढणारे ग्रामपंचायतीसाठी एकत्र येताना यापूर्वीचे राजकारण विसरून आपल्या गटाची सत्ता कशी येईल, याकरिता कट्टर विरोधकांशी हातमिळवणी करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय, आदींसह इतर गावपातळीवरील आघाड्या आपलीच सत्ता यावी यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे राजकीय चर्चा आणि ग्रामीण भागातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. राज्यातील सत्तातरानंतर निवडणुकाराज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार जाऊन भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आले आहे. या घडामोडीनंतर तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या पहिल्याच निवडणुका होत आहेत. यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.