शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

जिल्ह्यातील  संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 10:01 IST

राज्य सरकारने निवडणुका लांबणीवर टाकल्या; मात्र संचालक मंडळाला मुदतवाढ दिली नसल्याने कायद्याने संबंधित संस्थांवर प्रशासक येतो. यासाठी सोमवारी राज्य सरकारने मुदत संपलेल्या संस्थांच्या संचालक मंडळास निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देराज्य सरकारने निवडणुका लांबणीवर टाकल्या; मात्र संचालक मंडळाला मुदतवाढ दिली नसल्याने कायद्याने संबंधित संस्थांवर प्रशासक येतो.

कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २५०० संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असून, ‘गोकुळ’, जिल्हा मध्यवर्ती बॅँक, शिक्षक बॅँकेसह ‘राजाराम’, ‘वारणा’ साखर कारखान्यांचा समावेश आहे. ‘कोरोना’चे संकट, पावसाळा या सगळ्यांचा विचार करता या संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होणार हे निश्चित आहे.

सहकारी संस्थांबाबत ९७वी घटना दुरूस्ती झाल्यानंतर निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यानंतर एकदमच निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाल्याने सहकार विभागावर ताण आला. त्यातून आता कोठे निवडणुका नियमित सुरू झाल्या. तोपर्यंत राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीन महिने निवडणुका लांबणीवर टाकल्या. त्याची मुदत १८ जूनपर्यंत आहे. राज्य सरकारने निवडणुका लांबणीवर टाकल्या; मात्र संचालक मंडळाला मुदतवाढ दिली नसल्याने कायद्याने संबंधित संस्थांवर प्रशासक येतो. यासाठी सोमवारी राज्य सरकारने मुदत संपलेल्या संस्थांच्या संचालक मंडळास निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.‘कुंभी’ची निवडणूक वेळेतच होणार!कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २८ डिसेंबर २०२० रोजी संपत आहे. त्यामुळे १३ नोव्हेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाऊन २७ डिसेंबरला मतदान होईल, असे साखर सहसंचालक कार्यालयाने नियोजन केले असल्याने निवडणूक वेळेतच होण्याची शक्यता आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर?जिल्ह्यातील तीनशेहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होत आहेत. ‘कोरोना’चे संकट आणखी किती काळ राहणार, याचा अंदाज नसल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका विहीत वेळेत होण्याची शक्यता धूसर आहे. 

‘कुंभी’ची निवडणूक वेळेतच होणार!कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २८ डिसेंबर २०२० रोजी संपत आहे. त्यामुळे १३ नोव्हेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाऊन २७ डिसेंबरला मतदान होईल, असे साखर सहसंचालक कार्यालयाने नियोजन केले असल्याने निवडणूक वेळेतच होण्याची शक्यता आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर?जिल्ह्यातील तीनशेहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होत आहेत. ‘कोरोना’चे संकट आणखी किती काळ राहणार, याचा अंदाज नसल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका विहीत वेळेत होण्याची शक्यता धूसर आहे.या प्रमुख संस्थांच्या निवडणुका लटकल्या-संस्था मुदत कधी संपली‘गोकुळ’ मार्च २०२०जिल्हा बॅँक मे २०२०शिक्षक बॅँक एप्रिल २०२०‘कोजिमाशि’ एप्रिल २०२०‘शरद’ साखर मार्च २०२०डी. वाय. पाटील साखर मार्च २०२०राजाराम साखर एप्रिल २०२०वारणा साखर मे २०२०कुंभी साखर डिसेंबर २०२०कोल्हापूर बाजार समिती आॅगस्ट २०२०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक