आजरा तालुक्यातील ३० सहकारी संस्थांचा कोरोनामुळे थांबलेला निवडणूक कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याबाबतचा आदेश सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून देण्यात आला आहे. ३१ ऑगस्ट २०२१ या अर्हता दिनांकावर सर्व सहकारी संस्थांच्या प्रारूप व अंतिम मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत. त्यामुळे या सहकारी संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात असलेल्या व निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झालेल्या मात्र हरकतीच्या दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निवडणूक कार्यक्रम थांबलेल्या तालुक्यातील ३० सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये १० विकास सेवा संस्था, १० पतसंस्था तर दहा पाणीपुरवठा व मजूर संस्थांचा समावेश आहे.
३१ ऑगस्ट या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या पुन्हा नव्याने तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या संस्थांच्या निवडणुका होत आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या विकास सेवा संस्था अशा : चाळोबादेव - केरकबोळ, रवळनाथ-उचंगी, हिंदमाता-लाकूडवाडी, गणेश-मसोली, हनुमान-खोराटवाडी, बळीरामजी देसाई-पारेवाडी, गोठणाई देवी - मोरेवाडी, लक्ष्मी-किणे, भावेश्वरी-पेरणोली, श्रीराम-वेळवट्टी, रवळनाथ-वाटंगी, रवळनाथ-पोश्रातवाडी,
पतसंस्था अशा : दत्तात्रय शिंदे-कोळींद्रे, सूरज-उत्तूर, संत सेना महाराज-आजरा, विजय-हालेवाडी, गणपती खामकर-आजरा, संत गाडगेबाबा-आर्दाळ, प्रकाश-पेद्रेवाडी, शहीद जवान प्राथमिक शिक्षक पतसंस्था-आजरा, आजरा तालुका सहकारी संस्था सेवक पतसंस्था-आजरा, हिरण्यकेशी प्राथमिक शिक्षक पतसंस्था-आजरा.
मंजूर व पाणीपुरवठा संस्था - श्रीराम मजूर - मेंढोली , शिवशक्ती मजूर - आजरा, हिरण्यकेशी पाणीपुरवठा हात्तिवडे, सोमेश्वर पाणीपुरवठा - खानापूर, रवळनाथ अभिनव संस्था - विटे, भावेश्वरी शेतीमाल - मेंढोली, संकल्प शेतीमाल - हालेवाडी, भावेश्वरी बहुउद्देशीय - कोवाडे, ज्योतिर्लिंग शेतीमाल - खानापूर, आनंद गंगा कृषी बहुउद्देशीय - वझरे.
... कर्मचारी व २४३ संस्थांच्या निवडणुका.
तालुक्यात सहाय्यक निबंधक, सहाय्यक सहकार अधिकारी व कनिष्ठ लिपिक असे तीनच कर्मचारी आहेत. तर २४३ संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. तीन कर्मचाऱ्यांनी वर्षभर निवडणुका घ्यायच्या म्हटले तरी त्या संपणार नाहीत. त्यामुळे शासनाने आजऱ्याच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात कर्मचारी वर्ग वाढवावा अशी मागणी होत आहे.