शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक एप्रिलअखेर शक्य-‘वन बार वन व्होट’ प्रस्ताव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 18:38 IST

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘वन बार, वन व्होट’ या प्रस्तावाला विरोध करून तो फेटाळण्यात आला. अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली.

ठळक मुद्देवार्षिक सर्वसाधारण सभा : ; वर्षात १३ लाखाचा नफा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘वन बार, वन व्होट’ या प्रस्तावाला विरोध करून तो फेटाळण्यात आला. अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. बार असोसिएशनची निवडणूक एप्रिल महिनाअखेर होण्याची शक्यता असून, त्यासाठी सभेत अ‍ॅड. सुभाष पिसाळ यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

येथील न्यायसंकुलातील जिल्हा बार असोसिएशनच्या सभागृहात मंगळवारी ही सभा घेण्यात आली. २०१९-२० या वर्षासाठी पदाधिकारी निवडीसाठी तसेच ‘वन बार, वन व्होट’ या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी ही सभा आयोजित केली होती.

या सभेमध्ये २०१८-१९ या वर्षातील जमाखर्चाला मंजुरी देण्यात आली. या वर्षात बार असोसिएशनला सुमारे १३ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी यावेळी दिली. ‘वन बार, वन व्होट’ ही योजना वकिलांच्या एकीला हानिकारक व खंडपीठाच्या चळवळीला मारक असल्याने तिला सभेत विरोध केला. सभेमध्ये नवीन पदाधिकारी निवडीबाबत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. सुभाष पिसाळ व सहायक म्हणून अ‍ॅड. ए. एस. देसाई यांची निवड करण्यात आली. या महिनाअखेर निवडणुकीची तारीख निश्चित होणार असून ती येत्या दोन दिवसांत अ‍ॅड. पिसाळ जाहीर करण्याची शक्यता आहे.या सभेमध्ये अ‍ॅड. विजय पाटील-उत्तरेकर, अ‍ॅड. किरण पाटील, अ‍ॅड. कोमल राणे, अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक, इचलकरंजी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विवेक तांबे, राधानगरीचे अ‍ॅड. एच. आर. हलके यांनी आपले विचार मांडले.

यावेळी उपाध्यक्ष आनंदराव जाधव, सेक्रेटरी सुशांत गुडाळकर, जॉ. सेक्रेटरी तेजस नदाफ, लोकल आॅडिटर धैर्यशील पवार, महिला प्रतिनिधी मनीषा पाटील, सदस्य ओंकार देशपांडे, अभिषेक देवरे, संजय मुळे, युवराज शेळके, जयदीप कदम, आदी उपस्थित होते.प्रथमच कार्यकारिणीचे अभिनंदनविद्यमान अध्यक्ष व कार्यकारिणीने गेल्या दहा महिन्यांत चांगले काम केल्याबद्दल अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी अनुमोदन केले. बार असोसिएशनच्या इतिहासात प्रथमच असा अभिनंदनाचा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

 

खंडपीठाबाबत चर्चा करण्यासाठी उच्च न्यायालयाचे नूतन न्यायमूर्ती प्रदीप नांद्राजोग यांच्याकडे भेटीबाबत पत्रव्यवहार केला असून, २७ एप्रिलपर्यंत बैठकीची तारीख व वेळ निश्चित होईल.- अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय