शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: २५ लाख हेक्टर शेती सेंद्रिय पद्धतीने, एकनाथ शिंदे यांची घोषणा

By समीर देशपांडे | Updated: February 20, 2023 16:30 IST

Eknath Shinde: महाराष्ट्रामध्ये २५ लाख हेक्‍टरवर सेंद्रिय शेती करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्धार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

- समीर देशपांडे कोल्हापूर  : एकीकडे विकासाची प्रक्रिया गतीने सुरू असताना दुसरीकडे जमिनीसह पंचमहाभूतांची अतोनात हानी होत आहे. म्हणूनच यातून सावरण्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये २५ लाख हेक्‍टरवर सेंद्रिय शेती करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्धार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.   कोल्हापूर पासून जवळच असलेल्या कनेरी मठावर आयोजित सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शिंदे म्हणाले काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साकारला जात आहे. जे काम शासनाच्या पातळीवर करण्याची गरज आहे तेच काम आज कणेरी मठाच्या माध्यमातून होत असून त्याला पाठबळ देण्याची भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. या पुढच्या काळात देखील अशा पद्धतीचे लोकोत्सव महाराष्ट्रभर व्हावेत यासाठी शासन प्रयत्न करेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले संपूर्ण मानव जातीला अनेक प्रश्नांनी ग्रासले आहे. विविध प्रकारची प्रदूषणे ही रोगराईला आमंत्रण देत आहेत या पार्श्वभूमीवर सिद्धगिरी मठावर आयोजित या पंचमहाभूत लोकोत्सवाच्या माध्यमातून जागरण होईल असा विश्वास आहे. स्वामींवरील विश्वासामुळेच याचा संदेश सर्व जनतेपर्यंत जाईल. महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेतीला पाठबळ देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्माण करण्याचे ही ठरवले आहे. यावेळी खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे प्रकाश अबिटकर यांच्यासह वेगवेगळ्या राज्यातून आलेले मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे