कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी एकनाथ आंबेकर गुरुवारी रुजू झाले. किरण लोहार यांची सोलापूरला बदली झाली असून त्यांच्या जागी आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
पंधरा दिवसांपूर्वीच लोहार यांची सोलापूर येथे बदली झाली होती पण त्यांचा येथेच प्राथमिक शिक्षणाधिकारी होण्याचा आटोकाट प्रयत्न होता परंतू त्यात त्यांना यश आले नाही. आंबेकर सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी रत्नागिरी नगर परिषदेतून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. रत्नागिरी येथे २०१५ ते २०१८ या कालावधीत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. प्रथम अहवालात रत्नागिरी जिल्हा पहिल्या तीनमध्ये आला. यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले.
१००९२०२१ कोल एकनाथ आंबेकर