शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

आठ अज्ञातांचा युवकावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: January 22, 2017 00:34 IST

दुचाकीने घरी जाणाऱ्या तरूणाला रस्त्यात अडवून आठ अज्ञात इसमांनी बेदम मारहाण केली.

जहाँगीर शेख --कागल  कागलनगर, सांगाव आणि गेली १४ वर्षे मागासवर्गीय गृहनिर्माण तसेच आजी-माजी सैनिक गृहनिर्माण सोसायटीसाठी प्रस्तावित असणारा अंदाजे नऊ एकरांतील भूखंड शासनाने ‘म्हाडा’साठी वर्ग केल्याने अनेकांच्या घरकुलाच्या आशेवर पाणी पडले आहे. दरम्यान, या प्रस्तावित गृहनिर्माण सोसायट्या शासनाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीला लागल्या आहेत. तसेच रस्त्यावरचीही लढाई छेडण्याचा इशारा दिला आहे.कागल - कसबा सांगाव रस्त्याकडेला आणि गहिनीनाथ नगरसमोर ऐन मोक्यावर सर्व्हे नं. ४२५ हा मोठा भूखंड आहे. ३.६२ घरकुले हेक्टर इतके हे क्षेत्र आहे. या ठिकाणी मागासवर्गीयांच्यासाठी घरकुले उभारणी करण्यासाठी सिद्धार्थ हौसिंग सोसायटी आणि राजर्षी शाहू हौसिंग सोसायटी यांनी नगराध्यक्षांकडून ना हरकत परवाना घेऊन शासनाकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. त्याचबरोबर आजी-माजी सैनिकांनीही घरकुलांसाठी जागा मागणी केली आहे. गेली १५ वर्षे मंजुरीसाठी कागदोपत्री व्यवहार सुरू आहेत. जवळपास सहाशे सभासद या ठिकाणच्या घरकुलांवर आस लावून बसलेले आहेत.कागदपत्रे पूर्तता, मंजुरी, संस्था निर्मितीसाठी मोठा खर्चही करण्यात आला आहे, तर कागल नगरपालिकेनेही याच ठिकाणी दसरा मैदान, प्राथमिक शाळा, क्रीडांगण असे आरक्षण पालिका सभेत टाकले आहे. एकीकडे या भूखंडाच्या प्राप्तीसाठी अशी रस्सीखेच सुरू असताना आता महाराष्ट्र शासनाने ही जागा ‘म्हाडा’कडे वर्ग करण्याचे आदेश देऊन सात-बारावर तशी नोंद केल्याने शासनाच्या या एका आदेशाने अनेकांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. या जागेवर ‘म्हाडा’तर्फे गृहनिर्माण योजना उभी करण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध या प्रस्तावित गृहनिर्माण संस्था न्यायालयीन तसेच रस्त्यावरची लढाई लढणार आहेत. तशी तयारी सुरू केली आहे.कागलमध्ये म्हाडाचे आगमन...गट क्र. ४५२/२ पैकी ३.६२ आर हेक्टर इतक्या जागेवर म्हाडाचे नाव लावण्यात आले आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधीकरण, पुणे (म्हाडा) यांच्यावतीने येथे सदनिका उभारण्यात येईल. हे कामही येत्या महिन्याभरात सुरू होणार असल्याचे समजते. कागलमध्ये पहिल्यांदाच म्हाडाचे आगमन झाले आहे. मात्र, प्रस्ताव वर्षापूर्वीच शासनविचाराधीन झाल्याचे समजते.मोक्याची जागागेल्या दहा वर्षांत कागल शहराचा मोठा विस्तार झाला आहे. चोहोबाजूंनी शहर जागा दिसेल तिकडे पसरले आहे. आता म्हाडाने आरक्षित केलेल्या जागेभोवती अनेक नगरांची उभारणी झाली आहे. या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे येथे गेली १५ वर्षे हे गृहनिर्माणचे प्रस्ताव लटकलेले आहेत. ‘तू की मी’ यातूनही एकमेकांवर कुरघोडी केली गेली असतानाच आता हा भूखंड या सर्वांच्या हातून निसटला आहे. त्यामुळे ही खळबळ उडाली आहे.