शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळा घोटाळाप्रकरणी आणखी आठजण चौकशीच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 16:35 IST

kolhapur, muncipaltyCarporation, कोल्हापूर महानगरपालिकेतील गाजत असलेल्या घरफाळा घोटाळाप्रकरणी आणखी आठ कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असून त्यांना आज, बुधवारी कारणे दाखवा नोटीस लागू होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देघरफाळा घोटाळाप्रकरणी आणखी आठजण चौकशीच्या भोवऱ्यातकारणे दाखवा नोटीस बजावली जाण्याची शक्यता

कोल्हापूर : महानगरपालिकेतील गाजत असलेल्या घरफाळा घोटाळाप्रकरणी आणखी आठ कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असून त्यांना आज, बुधवारी कारणे दाखवा नोटीस लागू होण्याची शक्यता आहे.महानगरपालिकेत सध्या घरफाळा विभागातील घोटाळा गाजत असून त्याला वैयक्तिक राजकारण, हेवेदावे, कर्मचारी संघातील वर्चस्ववाद अशी अनेक कारणे कळीचा मुद्दा बनली आहे. एकीकडे नगरसेवक भूपाल शेटे तर दुसरीकडे नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून काही प्रकरणे समोर आणली आहेत. मात्र, त्यात काही कर्मचाऱ्यांचा संबंध नसतानासुद्धा सापडले जाऊ लागले आहेत.निलंबित करनिर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर यापूर्वीच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घरफाळा घोटाळ्यात एकूण अठरा प्रकरणे समोर आली, परंतु त्यापैकी चार प्रकरणांची चौकशी होऊन कारंडे व अन्य तीन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली; पण चौदा प्रकरणांची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.नगरसेवक शेटे यांनी बुधवारी आयुक्त कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन अन्य दोषींवरसुद्धा कारवाई करावी अशी मागणी केली. चौकशी समितीने आठ कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आज, बुधवारी आणखी आठ कर्मचाऱ्यांना उपायुक्त निखिल मोरे यांच्यामार्फत कारणे दाखवा नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कर्मचारी संघाचे पदाधिकारीदेखील असतील.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर