शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

आठ बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 00:42 IST

जिल्ह्यात दिवसभर उघडझाप : गगनबावड्यात दमदार पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली असून, सोमवारी दिवसभर उघडझाप राहिली. गगनबावडा तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, विविध नद्यांवरील आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. खरीप पिकाला सध्या दमदार पावसाची गरज आहे. गेले तीन-चार दिवस परतीच्या पावसाने हजेरी लावली असली तरी गगनबावडा वगळता इतरत्र अद्याप दमदार एंट्री झालेली नाही. करवीर, हातकणंगले, कागल, शिरोळ तालुक्यांत एक-दोन मोठ्या सरींचा अपवाद वगळता केवळ भुरभुर सुरू आहे. पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस आहे. कोल्हापूर शहरात सकाळी रिपरिप सुरू होती; पण दुपारनंतर ऊन पडले. सायंकाळनंतर पुन्हा रिपरिप सुरू झाली. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०.९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ५३.५० मिलिमीटर झाला आहे. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने विसर्ग वाढला आहे.राधानगरीतून प्रतिसेकंद २२००, वारणातून ५५८०, कासारीतून २५०, कडवीतून ३२२, तर कुंभी धरणातून १०७५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना फुग आली आहे. पंचगंगा नदीची पातळी २१ फुटांच्या वर गेली असून, आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. (प्रतिनिधी)शेतकरी गाफील : विद्युत पंप पाण्यावर !