शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

‘यशवंत’च्या बिनविरोधासाठी प्रयत्न

By admin | Updated: November 9, 2016 00:53 IST

सत्ताधारी गटाच्या हालचाली : विरोधक शांतच, नोकरभरतीचा मुद्दा येणार ऐरणीवर

कोपार्डे : मागील वेळी मोठ्या चुरशीने झालेल्या कुडित्रेच्या श्री यशवंत सहकारी बँकेची निवडणूक यंदा बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी गटाने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीकडे विरोधकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यमान संचालकांत फूट पडली नाही तर ‘यशवंत’ची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. मागील निवडणूक संस्थापक अध्यक्षांच्या विरोधात बंड झाल्याने मोठ्या चुरशीने झाली; पण यात संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील (शिंगणापूरकर) यांचा अडीच ते तीन हजार मतफरकाने पराभव करत अ‍ॅड. प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले होते.जिल्हा कार्यक्षेत्र असणारी श्री यशवंत सहकारी बँक कुंभी-कासारी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील करवीर, पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यांतील प्रमुख अर्थवाहिनी समजली जाते. या बँकेच्या माध्यमातूनच करवीर विधानसभा व कुंभी-कासारी साखर कारखान्यातील आ. चंद्रदीप नरके गट सक्रिय आहे.मागील पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली असताना अचानक किरकोळ मुद्द्यावरून बोलणी फिस्कटल्याने निवडणूक लागली होती. तसेच बँकेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील हे आ. नरके गटाकडे झुकल्याने यशवंत मंचच्या नेत्यांनी आपले विरोधी पॅनेल उभा केले. त्यावेळी इतर मागास प्रवर्गातील संस्थापकांचा एकमेव उमेदवार बिनविरोध निवडून आला, अन्यथा अ‍ॅड. प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे उमेदवार २५०० ते ३००० मतांच्या फरकांनी निवडून आले होते.बँकेचा कारभार देसाई यांच्या हातात आला त्यावेळी बँक तोट्यात होती. बँकेची आसुर्ले-पोर्ले शाखा तोट्यात असल्याने ती शाखा बंद करावी, अशी मागणी सभासदांनी केली होती. मात्र, याला बगल देत अत्यंत काटेकोर कारभार करून त्यांनी बँक फायद्यात आणली. चालू अहवाल वर्षात बँकेने ७० लाखांचा नफा मिळविण्यासह आॅडिट वर्ग ‘अ’ मिळविण्यात सातत्य राखले आहे. याच अनुषंगाने रिझर्व्ह बँकेने आणखी दोन शाखा उघडण्यास परवानगी दिल्यामुळे बँकेचे दहा शाखांमध्ये विस्तारीकरण झाले आहे.सध्या बँकेची २०१६ ते २०२१ साठी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यमान संचालक मंडळाने यशवंत मंच अबाधित ठेवण्यासाठी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. आ. नरके यांनी बंधू अजित नरके यांच्या नेतृत्वाखाली कुंभी बँकेची निवडणूक बिनविरोध करून निवडणूक खर्चापासून बँकेला वाचविले आहे. त्यामुळे यशवंत बँकेतील निवडणुकीबाबत त्यांना कोणतीच उत्सुकता नसल्याचे स्पष्ट आहे.त्यातच संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील (शिंगणापूरकर) हेही शांत असून, आगामी काळात विद्यमान संचालकांमध्ये फूट पडली तरच ‘यशवंत’च्या बिनविरोध निवडीला अडचणी निर्माण होणार आहेत, अन्यथा ही बँकही कुंभी-कासारी बँकेप्रमाणे बिनविरोधच्या वाटेवर असून तशा राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.नोकर भरतीमुळे संचालकांना विरोध ?सध्या संगणकीय प्रणालीद्वारे नोकर भरतीवर चाप लावून बँकेचा खर्च वाचविता आला असता. त्यामुळे अहवाल सालात बँकेचा नफा एक कोटीवर गेला असता; पण विद्यमान संचालकांनी आपल्या सग्यासोयऱ्यांची नोकर भरती करून मोठा आर्थिक बोजा वाढविल्याचा सूर येत आहे. यामुळेच विद्यमान संचालकांबाबत नाराजी आहे.