शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

चार विद्यार्थी शोधण्यासाठी १०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : शिक्षकांना शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्याचे शिक्षण विभागाकडून मिळालेल्या आदेशाने शिक्षक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : शिक्षकांना शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्याचे शिक्षण विभागाकडून मिळालेल्या आदेशाने शिक्षक गल्ली-गल्लीत शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी शाळेच्या वेळेत फिरत आहेत. यामुळे शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच जागेवर नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, याबाबत पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कोरोना महामारीच्या काळात गेली सात ते आठ महिने शाळांचे दरवाजे बंद होते. यावर्षीचे शैक्षणिक वर्षे सध्या शासनाने सुरू केले आहे. तेही प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालय यांना सक्त नियम पाळून यावर्षीचा दिलेला शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा आहे. प्राथमिकसाठी सकाळी ११ ते २ शाळा भरविण्यात येत आहेत.

पण, शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा अहवाल देण्यासाठी शिक्षकांना आदेश दिले आहेत. १० एप्रिलपर्यंत हा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा अहवाल सादर करायचा आहे. म्हणून शिक्षक गावातील गल्ली-गल्लीत व वीटभट्टी व ऊसतोड मजुरांच्या झोपड्या शोधत आहेत.

. हे काम शिक्षक शाळेच्या वेळेतच करीत असल्याने शाळेत असणारी २०० ते ४०० विद्यार्थी वर्गाऐवजी मैदानावर दिसत आहेत. याबाबत पालकांच्या तक्रारी शिक्षण व्यवस्थापन समितीकडे गेल्याने काही गावात शाळेत जाऊन याबाबत जाब विचारला जात आहे. पण, अधिकाऱ्यांचे आदेश असल्याने आम्हाला ते करावे लागत असल्याचे शिक्षकांनी सांगितल्याने पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

.

प्रतिक्रिया -

१० एप्रिलपर्यंत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनाचे आहेत. हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि हे काम कोणत्या वेळेत करायचे याबाबत बंधन नसल्याने शिक्षक शाळेच्या वेळेत हे काम करतात यात काही गैर नाही अशाप्रकारे गटशिक्षणाधिकारी यांनी त्याचे समर्थन केले.

एस. के. यादव (गटशिक्षणाधिकारी करवीर )--

आता कुठे शाळा सुरू झाल्या आहेत. वर्ष संपत आले आहे. दोन शिक्षक पदे रिक्त आहेत, तर एखादा शिक्षक रजेवर गेला तर अडचण. चार शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी शिक्षक गल्लोगल्ली फिरत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून शाळेत असणारे ४०० विद्यार्थी मैदानावर खेळताना दिसत आहेत. याबाबत मुख्याध्यापकाकडे तक्रार केली तर वरिष्ठांनी आदेश दिल्याचे सांगितले जात आहे. शाळेच्या वेळेनंतर हे काम शिक्षकांनी करावे व शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करावा. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुट्टीत करावे.

कृष्णात पाटील (शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, वाकरे. )