शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाचा निर्णय : २६ जूनअखेर विशेष अभियान; प्रवेश क्रमांकाशी जोडणार

By admin | Updated: April 23, 2015 00:29 IST

प्रत्येक बालकाचे आधार कार्ड काढून घेण्यासाठी प्रयत्नशील राहू. विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना आधार कार्डशी जोडण्यात येतील.

भीमगोंडा देसाई -कोल्हापूरशासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यास आधार कार्ड देण्यासाठी २७ एप्रिल ते २६ जूनअखेर विशेष अभियान राबविण्याचा आदेश मंगळवारी अप्पर सचिव बी. आर. माळी यांनी काढला आहे. प्रवेश क्रमांकाशी जोडून शाळाबाह्य मुलांचा नेमकेपणाने शोध घेण्यासाठी आधार कार्डची मदत घेतली जाणार आहे. विशेष बैठक बोलावून ८ मे रोजी गावातील शंभर टक्के बालकांचे आधार कार्ड तयार करण्याचा संकल्प करून ग्रामस्थांना प्रतिज्ञा दिली जाईलसमाजातील ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित शाळेत उपस्थित राहून शिक्षणाचे धडे घेतल्याशिवाय शिक्षण हक्क कायद्याचा मुख्य हेतू सफल होणार नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यापूर्वी शिक्षण प्रशासनाने अनेक उपक्रम राबविले. मात्र,नेमकेपणाने शाळाबाह्य मुलांची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे शिक्षण विभागाने आता शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रवेश क्रमांक आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आधार कार्ड देण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी यांनी शाळानिहाय किती विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाहीत, त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयास देण्याची सूचना दिली आहे. ज्या दिवशी शाळेत, वॉर्डात, गावात आधार कार्डसाठी आवश्यक व्यवस्था केली आहे, त्याच्या आदल्या दिवशी संबंधित विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पालकास माहिती देण्याची जबाबदारी शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सोशल मीडिया, वृत्तपत्र, दवंडी, प्रचारपत्रके, या माध्यमातून व्यापक जागृती होणार आहे. २७ एप्रिलपासून अभियानाला प्रारंभ होईल. २ मे अखेर गटशिक्षणाधिकारी यांनी आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची नावे देणे, ३ ते ४ मे अखेर गावनिहाय यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देणे, ५ रोजी जिल्हास्तरावर, तर ६ रोजी बैठक घेऊन नियोजन करणे, ७ रोजी गावपातळीवर आधार कार्डचे नियोजन जाहीर करणे, ८ रोजी गावातून फेरी काढून जागृती करणे, अशी अंमलबजावणी केली जाणार आहे. २६ जूनपर्यंत आधार कार्ड देऊन प्रवेश क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे. प्रतिज्ञा अशीप्रत्येक बालकाचे आधार कार्ड काढून घेण्यासाठी प्रयत्नशील राहू. विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना आधार कार्डशी जोडण्यात येतील. त्याचा लाभ प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घेता येईल, याची आम्हाला जाणीव आहे. आधार कार्डाच्या क्रमांकाशी शाळेतील प्रगती यंत्रणा जोडल्यामुळे कोणता विद्यार्थी काय, किती शिकत आहे, याचीही माहिती होईल. आधार कार्डमुळे विद्यार्थी संलग्न झाल्याने शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी शाळेशी जोडलेला राहील. शाळाबाह्य होणार नाही.