शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

लाचप्रकरणी घुणकीच्या तत्कालीन तलाठ्यास शिक्षा

By admin | Updated: July 7, 2015 01:19 IST

दोषारोपपत्र सिद्ध

कोल्हापूर : सातबारा खाते उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेतल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने घुणकी (ता. हातकणंगले) येथील गावचावडीतील तत्कालीन तलाठी सुभाष पांडुरंग जाधव (वय ४१, रा. वडूज, ता. खटाव, जि. सातारा) याला एक वर्ष सक्तमजुरी व आठ हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायाधीश के. डी. बोचे यांनी सोमवारी सुनावली. दरम्यान, संशयितजाधव याने दंडाची रक्कम भरून वकिलातर्फे जामीन दिल्याने न्यायालयाने त्याची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. फिर्यादी जावेद शमशुद्दीन मुल्ला (३२ रा. जुने पारगाव, ता. हातकणंगले) यांचे आजोबा अब्दुल रसूल मुल्ला यांची मौजे चावरे गावी हजरत पीर देवस्थानचे भूमापन गट क्रं. ३९६ मध्ये जमीन आहे. दि. ७ डिसेंबर १९९६ रोजी आजोबाचे निधन झाले. त्यामुळे वारस म्हणून वडील शमशुद्दीन मुल्ला यांचे नाव खातेउताऱ्यावर नोंद करण्यासाठी त्यावेळच्या तलाठ्यांकडे अर्ज केला. जावेद हे वडिलांचे नाव नोंद झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी २३ जून २००६ रोजी घुणकी गावचावडीमध्ये गेले. यावेळी तलाठी सुभाष जाधव यांनी वारस नोंदणीसाठी २ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर जावेद यांनी २८ आॅगस्ट २००६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सापळा रचला. जावेद यांनी तलाठी जाधव यांची घुणकी गावचावडीमध्ये भेट घेतली. ठरलेल्यापैकी पाचशे रुपयांची जावेदकडून घेताना पोलिसांनी जाधव याला रंगेहात पकडले. पोलीस निरीक्षक वसंतराव बागल यांनी तपास पूर्ण करून दोषारोपत्र न्यायालयात सादर केले. खटल्यात सरकारतर्फे वकील दिलीप मंगसुळे यांनी फिर्यादी जावेद मुल्ला, पंच पांडुरंग नेरर्लेकर, तत्कालीन इचलकरंजी विभागाचे प्रांताधिकारी वाय. ए. पोमण व पोलीस निरीक्षक बागल आदी साक्षीदार तपासले. खटल्यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंच, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.