शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीत व्यावसायिकावर ईडीचा छापा, सलग १५ तास कसून चौकशी; कारवाईने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ

By उद्धव गोडसे | Updated: June 21, 2025 13:28 IST

ईडीसह पोलिसांकडून गोपनीयता

कोल्हापूर : ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने शुक्रवारी हुपरी (ता. हातकणंगले) येथील व्यावसायिक आणि हुपरी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांच्या घरावर छापा टाकला. पहाटेपासून सलग १४५ तास लठ्ठे यांची चौकशी सुरू होती. या कारवाईने हुपरीसह जिल्ह्यात खळबळ उडाली असून, छापेमारीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.ईडीच्या पथकांनी शुक्रवारी देशात अनेक ठिकाणी छापेमारी केली. या कारवाई दरम्यान एक पथक चंदेरीनगरी हुपरी येथील व्यावसायिक भरत लठ्ठे यांच्या घरी पोहोचले. लट्ठे यांनी सुरू केलेल्या भिशी, निधी बँक आणि परवानाधारक खासगी सावकारीच्या व्यवहारांची माहिती पथकाने घेतली. त्यांची बँक खाती आणि आर्थिक व्यवहाराचे तपशील अधिका-यांनी तपासले. याबाबत सलग १५ तास त्यांची कसून चौकशी सुरू होती.लठ्ठे कुटुंबीयांसह त्यांच्या काही नातेवाईकांचीही चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, कारवाईचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. लठ्ठे यांचे एक मित्र दुबईत व्यावसायिक आहेत. तसेच ते निधी बँक चावलतात. याच्याशी संबंधित माहिती अधिका-यांनी घेतल्याचे समजते. व्यावसायिक लठ्ठे हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत. त्यांच्यापेक्षा मोठे आर्थिक व्यवहार असलेले अनेक व्यावसायिक हुपरीत आहेत. तरीही त्यांच्यावरच ईडीची छापेमारी का झाली, हे स्पष्ट झालेले नाही.