शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक ‘सोलर ड्रायर’, फळे-भाजी वर्गीकरण करणारे यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 12:36 IST

पर्यावरणपूरक सोलर ड्रायर, फळे-भाजी वर्गीकरण करणारे यंत्र, वायरलेस वॉटर कंट्रोल मशीन, थ्रीडी इंटरनेट असे विज्ञान व तंत्रज्ञानाचे विविध प्रकल्प शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी बुधवारी सादर केले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी लोककला केंद्रात विद्यार्थ्यांनी गर्दी केली.

ठळक मुद्देपर्यावरणपूरक ‘सोलर ड्रायर’, फळे-भाजी वर्गीकरण करणारे यंत्रशिवाजी विद्यापीठातील विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांची गर्दी

कोल्हापूर : पर्यावरणपूरक सोलर ड्रायर, फळे-भाजी वर्गीकरण करणारे यंत्र, वायरलेस वॉटर कंट्रोल मशीन, थ्रीडी इंटरनेट असे विज्ञान व तंत्रज्ञानाचे विविध प्रकल्प शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी बुधवारी सादर केले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी लोककला केंद्रात विद्यार्थ्यांनी गर्दी केली.विद्यापीठातील स्कूल आॅफ नॅनोसायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, डॉ. ए. एम. गुरव, स्कूल आॅफ नॅनोसायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे समन्वयक डॉ. पी. एस. पाटील, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. नमिता खोत, सागर डेळेकर, आदी उपस्थित होते.

कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शन पाहण्यास विद्यापीठ, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

उद्घाटनानंतर प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी प्रदर्शनातील विविध प्रकल्पांची माहिती घेतली. प्रदर्शनात गोखले महाविद्यालयातील बी. एस्सी. तृतीय वर्षातील विद्यार्थी संचेत दळवी याने ‘अ‍ॅटोमेटिक वॉटर अँड सेव्ह वॉटर’ हा प्रकल्प सादर केला. त्यामध्ये त्याने स्वच्छतागृहातील पाणी वापरासाठी प्रेस कॉकच्या उपयोगाचे संशोधन मांडले. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील वैभव बागे याने ‘इकोफ्रेंडली सोलर ड्रायर’चे संशोधन सादर केले. त्यामध्ये पवन, सौरऊर्जा आणि जीओ कुलिंग सिस्टिमच्या वापरातून तयार केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.

अंजली भोसले आणि प्रज्ञा कांबळे यांनी फूड प्रोसेस इंडस्ट्रिजसाठी उपयुक्त ठरणाऱ्या फळे, भाजी वर्गीकरण करणारे यंत्राचे संशोधन मांडले. त्यामध्ये उत्तम दर्जाची, चांगले आणि खराब अशा विभागांमध्ये फळे आणि भाजी यांचे वर्गीकरण केले जाते. इलेक्ट्रॉनिक्स विभागातील एम. एस्सी. अभ्यासक्रमाच्या पांडुरंग गायकवाड याने घरातील पाणी व्यवस्थापनासाठीचे वायरलेस वॉटर लेव्हल कंट्रोल प्रकल्प सादर केला. या विभागातील अमोल माळी याने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारी ‘स्मार्ट ब्लार्इंड स्टिक’ सादर केली. भित्तीपत्रकांच्या माध्यमातून थ्री-डी इंटरनेट, बुके पेपर, नॅनो मेडिसीन, आदींबाबतचे संशोधन, अभ्यासाची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

प्रयोगशाळा खुल्याविज्ञान दिनानिमित्त विद्यापीठातील भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, आदी विभागांतील सर्व प्रयोगशाळा विज्ञानप्रेमी नागरिकांसाठी खुल्या ठेवण्यात आल्या होत्या. अन्य विभागांतील काही विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळांना भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली. 

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर