शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

दीड महिन्यात ६० हजार नागरिकांना दिले ई-पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:48 IST

लॉकडाऊनमुळे कोल्हापुरात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांपासून ते महत्त्वाच्या कारणांसाठी बाहेरगावी जावे लागणाऱ्या नागरिकांपर्यंत अशा ६० हजार लोकांनी गेल्या दीड महिन्यात ई-पासचा लाभ घेतला आहे; तर कागदपत्रांची योग्य पूर्तता न केलेल्या अथवा तांत्रिक कारणांमुळे ९७ हजार १६० अर्ज नाकारण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची तत्परता ९७ हजार जणांचे पासचे अर्ज नामंजूर, १३ हजार अर्ज प्रलंबित

इंदुमती गणेशकोल्हापूर : लॉकडाऊनमुळे कोल्हापुरात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांपासून ते महत्त्वाच्या कारणांसाठी बाहेरगावी जावे लागणाऱ्या नागरिकांपर्यंत अशा ६० हजार लोकांनी गेल्या दीड महिन्यात ई-पासचा लाभ घेतला आहे; तर कागदपत्रांची योग्य पूर्तता न केलेल्या अथवा तांत्रिक कारणांमुळे ९७ हजार १६० अर्ज नाकारण्यात आले आहेत.सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनमुळे हजारो नागरिक कोल्हापुरात अडकून पडले होते. लॉकडाऊन ३ पासून सरकारने नागरिकांना ई-पास घेऊन आपापल्या गावी जाण्याची परवानगी दिली. सुरुवातीला ही यंत्रणा पोलीस प्रशासनाकडे होती. नंतर मे महिन्यात ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग झाली, तेव्हापासून कार्यालयातील १० ते १५ जणांचा स्टाफ या कामात गुंतला होता.

या काळात रेल्वे, बसने गावी गेलेल्या मजुरांपासून ते कोल्हापुरात अडकलेले परस्थ नागरिक, वैद्यकीय कारणांसाठी परगावी जावे लागणारे रुग्ण-नातेवाईक, नातेवाइकाचा मृत्यू अशा सगळ्या अडल्या-नडलेल्या नागरिकांना ई पासद्वारे प्रवासाची परवानगी देण्यात आली. आजवर ६० हजार १४६ नागरिकांनी या ई-पासचा लाभ घेतला. त्यांपैकी ५६ हजार ७५२ नागरिकांच्या पासची वैधता संपली आहे. त्यांचा पासचा कालावधी पूर्ण झाला आहे.प्रवासासाठी दिलेले कारण योग्य नसेल, मेडिकल सर्टिफिकेट जोडलेले नसेल अथवा अर्ज व्यवस्थित भरलेला नसेल असे ९७ हजार १६० अर्ज नाकारण्यात आले आहेत; तर १३ हजार ९१४ अर्ज प्रलंबित आहेत.मृत्यू आणि वैद्यकीय कारणासाठी सूटसध्या नागरिकांना केवळ कोल्हापुरातून बाहेरगावी जाण्यासाठी ई-पास दिला जातो. व्यक्ती एका दिवसात जाऊन येणार असेल तर वन-डे पास दिला जातो. कोणालाही जाताना व येतानाचा पास दिला जात नाही. मात्र या नियमाला नातेवाइकाचे निधन व अत्यावश्यक वैद्यकीय सेवेला वगळण्यात आले आहे. या दोन्ही कारणांमध्ये व्यक्तीला जाण्यासाठी व परत येण्यासाठी ई-पास दिला जातो.कामाचा ताण झाला कमीमहसूल विभागाने आपले मूळ काम बाजूला ठेवून ई-पाससाठी सगळी यंत्रणा लावली आहे. जयसिंगपूरमध्ये पैसे घेऊन ई-पास देण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. नोकरी व्यवसाय व उद्योगानिमित्त सांगली-साताऱ्याला जाण्यासाठी दैनंदिन पास देण्याची जबाबदारी जिल्हा उद्योग केंद्र, तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावरील ताण आता कमी झाला आहे. ई-पासचा १० जणांचा स्टाफ वगळता अन्य विभागांतील कर्मचारी आपापली जबाबदारी सांभाळत आहेत.ई-पासची सेवा सुरू झाल्यापासून प्रशासनाकडे दिवसाला कमीत कमी १५००, तर जास्तीत जास्त पाच हजार इतके अर्ज आले आहेत. आता दैनंदिन पासची जबाबदारी विभागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील अर्जांचे प्रमाण कमी झाले आहे. नोकरी, व्यवसायाव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी ज्यांना परगावी जायचे आहे, त्यांना येथे पास मिळतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर