शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आजरा अर्बन बँकेसाठी सत्तारुढमधून नऊजणांना डच्चू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 12:33 IST

Banking Sector Kolhapur- पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या आजरा अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३८ अर्ज दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देआजरा अर्बन बँकेसाठी सत्तारुढमधून नऊजणांना डच्चू १८ जागांसाठी ३८ अर्ज : निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या आजरा अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३८ अर्ज दाखल झाले आहेत.

यामध्ये नियोजित सत्तारूढ आघाडीव्यतिरिक्त केवळ दोघांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता अधिक आहे. आण्णा भाऊ संस्था समूहाचे नेते अशोक चराटी यांनी धाडसी निर्णय घेत नऊ विद्यमान संचालकांना डच्चू दिला तर दहा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ संचालकांसह दहा नव्या उमेदवारांसह त्यांच्या डमी अर्ज केलेल्या नातेवाईकांनी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी अरूण काकडे यांच्याकडे अर्ज दाखल केले. आजरा अर्बन बँकेच्या प्रतिभानगर शाखेमध्ये निवडणूक कार्यालय उघडण्यात आले आहे. आघाडीकडून ज्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत, त्यांच्याच घरातील एखाद्याचा अर्ज डमी म्हणून भरण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता छाननी होणार आहे.अशोक चराटी यांनी एकहाती निर्णय घेत संचालक मंडळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. चराटी यांचे बंधू अजित हे संचालक मंडळात होते. परंतु, त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी अशोक चराटी हे संचालक मंडळात असतील. बँकेचे संस्थापक संचालक म्हणून काम पाहिलेल्या काशिनाथ भुसारी आणि विश्वनाथ महाळंक यांच्या मुलांना चराटी यांनी नव्या संचालक मंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. आदम पठाण यांनी सर्वसाधारण गटातून आणि मलकापूरचे प्रवीणसत्तारूढांकडून निश्चित करण्यात आलेली नावे -अशोक चराटी, सुरेश डांग, विलास नाईक, दीपक सातोस्कर, प्रकाश वाटवे, अनिल देशपांडे, रमेश कुरूणकर, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारूती मोरे, आनंदा फडके, अस्मिता सबनीस, सुनील मगदूम, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, प्रणिता केसरकर, शैला टोपले, संजय चव्हाणयांना वगळलेविजयकुमार पाटील, बाबू लतीफ, सुधाकर पांडव, मधुकर भारती, उषा देसाई, सुरेश गड्डी, आर. डी. पाटील कोल्हापूर, कृष्णकांत कांदळकर, अशोक पाटील.१३ जानेवारीला सर्वसाधारण सभामल्टिस्टेट को-ऑप सोसायटीच्या नियमानुसार दिनांक १३ जानेवारीला दुपारी ३ वाजता आजरा हायस्कूलच्या मैदानावर बँकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. दिनांक ११ जानेवारीपर्यंत माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी तेवढेच अर्ज शिल्लक राहिले तर या सर्वसाधारण सभेत निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात येईल. मात्र, तसे झाले नाही तर सभा तहकूब करून निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू होईल.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर