शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

दुष्काळातही कोल्हापूरकरांच्या गाड्या सुसाटच

By admin | Updated: May 28, 2016 00:48 IST

वाहन विक्रीचा वेग कायम : ‘प्रादेशिक परिवहन’कडे एका महिन्यात ७८६८ दुचाकींची नोंद

सचिन भोसले -- कोल्हापूर --कोल्हापूरकर आणि त्यांच्या गाड्यांच्या प्रेमाबद्दलचे कौतुक राज्यात सर्वश्रुत आहे. राज्यात एका बाजूला दुष्काळी परिस्थितीमुळे वाहनांसह अन्य वस्तूंच्या खरेदीचा वेग मंदावला आहे. मात्र, कोल्हापूर याला अपवाद ठरत आहे. केवळ एप्रिल महिन्यात ७८६८ इतक्या दुचाकी नव्याने रस्त्यावर आल्या आहेत. दर महिन्यात सरासरी ९००० इतक्या दुचाकी विक्रीच्या जवळपासच ही आकडेवारी असल्याने दुष्काळातही कोल्हापूरकरांच्या गाड्या सुसाटच म्हटले, तर वावगे ठरणार नाही. कंपन्यांनी बाजारात आणलेल्या नव्या गाड्यांच्या पहिल्या लॉटमधील गाडी कोल्हापूरच्या रस्त्यावर येतेच. याकरिता आगाऊ पैसे भरून का असेना, त्या गाडीचे आरक्षण करणारे अनेक हौशी या जिल्ह्यात आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच सधन असलेल्या व पाण्याचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातही दुष्काळाच्या झळा कमी-जास्त प्रमाणात बसत आहेत. तरीही कोल्हापूरकरांचे वाहनप्रेम मात्र काही केल्या कमी होत नाही. एप्रिल महिन्यात सर्व प्रकारच्या ९३७९ वाहन खरेदीपैकी ७८६८ इतक्या दुचाकींची नोंद नव्याने झाली आहे. त्यातून मागील महिन्यांतील नोंद झालेल्या गाड्यांची आकडेवारी पाहता ती सरासरी इतकीच आहे. याशिवाय चारचाकी गाड्याही नेहमीच्या वेगानेच रस्त्यावर येऊ लागल्या आहेत. ९८५ चारचाकी वाहने गेल्या महिन्यात रस्त्यांवर नव्याने दाखल झाली आहेत. महिन्याकाठी किमान एक हजार चारचाकी वाहने रस्त्यावर येतात. वाहनवाढीचा वेग पाहता, सद्य:स्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १० लाख ७३ हजार १४५ वाहनांची कागदोपत्री नोंद आहे. यात नव्याने महिन्याकाठी सरासरी आठ ते नऊ हजार नव्या वाहनांची भर पडत आहे. दोन्ही बाजूंनी जिल्ह्याचा विचार केला तर प्रत्येक ‘दोन माणसी एक वाहन’ असे गणित आहे. त्यामुळे दुष्काळ असो वा सुकाळ; कोल्हापूरकरांच्या गाड्या सुसाटच, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.यंदा दुष्काळी स्थिती असूनही एप्रिल महिन्यात १८२ नवीन ट्रॅक्टर व ७० ट्रेलरची नोंद प्रादेशिक परिवहन खात्याकडे झाली आहे.