शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
4
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
5
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
6
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
7
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
8
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
9
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
10
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
11
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
12
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
13
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
14
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
15
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
16
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
17
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
20
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

दुर्गेश पवार टोळीतील १२ जणांना अखेर ‘मोक्का’

By admin | Updated: July 30, 2016 00:31 IST

पोलिसप्रमुखांचा दणका : कळंबा कारागृहातून अटक करणार; गुन्हेगार टोळ्यांविरुद्ध झोपडपट्टीदादा कायद्याखाली कारवाई करणार

सांगली : येथील गोकुळनगरमध्ये गुंड रवींद्र कांबळे याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दुर्गेश पवार टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई करण्यास कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी मंजुरी दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या टोळीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून ‘मोक्का’च्या गुन्ह्यात लवकरच अटक केली जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.दुर्गेश नागाप्पा पवार (वय ३७), प्रशांत ऊर्फ परशा नागाप्पा पवार (३१), प्रशांत ऊर्फ परसू दुर्गाप्पा पवार (२६), नागेश ऊर्फ काळू दुर्गाप्पा पवार (२४), अशोक बाळाराम माकडवाले-जुधळे (३१), पप्या ऊर्फ राकेश शंकर दुधाळ (२६), विकास ऊर्फ आप्पा भीमाप्पा कांबळे (२२), गणेश रामाप्पा ऐवळे (२८), मोन्या ऊर्फ विशाल ऊर्फ यल्लाप्पा बापू पवार (३६), रवी ऊर्फ अशोक मसू पवार (२०), अमोल गंगाप्पा कुंचीकोरवी (२०), मारुती मत्ताप्पा पवार (३३, सर्व रा. वडर कॉलनी परिसर, सांगली) अशी मोक्का लागलेल्या टोळीतील संशयितांची नावे आहेत. दुर्गेश पवार व प्रशांत ऊर्फ परशा पवार हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रत्येकी चार, तर प्रशांत ऊर्फ परसू पवार व नागेश पवार यांच्याविरुद्ध प्रत्येकी दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीतील अन्य आठजण कांबळेच्या खूनप्रकरणी पहिल्यांदाच रेकॉर्डवर आले आहेत. शिंदे म्हणाले, मृत रवींद्र कांबळे हा गुंड म्हमद्या नदाफ टोळीचा सदस्य होता. त्यांनी अनेकदा शहरात एकत्रित गुन्हे केले आहेत. २००९ मध्ये म्हमद्याने (पान १२ वर)...ही तर सुरुवात : दत्तात्रय शिंदेजिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. पत्रकारांच्या पहिल्याच भेटीत त्यांनी कामाची दिशा स्पष्ट करून, ती बोलण्यापेक्षा कृतीतून दिसेल, असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी दुर्गेश पवार टोळीला मोक्का लावून कारवाईचा दणका दिला आहे. ते म्हणाले, यापुढे शहरात असो अथवा जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्या रेकॉर्डवर आल्या, तर त्यांना सोडणार नाही. ही तर सुरुवात आहे. जेव्हा-जेव्हा गुन्हेगारी टोळ्या डोके वर काढतील, तेव्हा त्यांच्याविरुद्ध मोक्का तसेच झोपडपट्टीदादा कायद्याचे हत्यार उपसले जाईल. एकाही टोळीला सक्रिय होऊ देणार नाही.दुर्गेश पवार याच्यावर भरदिवसा खुनी हल्ला केला होता. तेव्हापासून म्हमद्या व दुर्गेश पवार टोळीत संघर्ष सुरू होता. रवींद्र कांबळे व दुर्गेश पवार टोळीची गोकुळनगरमध्ये नेहमी उठ-बस असायची. याठिकाणी वर्चस्व कोणाचे? या वादातून दुर्गेश पवारने ४ जुलैला साथीदारांच्या मदतीने गोकुळनगरमध्ये रवींद्रचा दगडाने ठेचून खून केला आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा बेकायदेशीर गुन्हेगारी कारवाया केल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत दुर्गेश व परशा पवार यांच्याविरुद्ध विविध गुन्ह्यांत दोनपेक्षा जादावेळा न्यायालयात दोषारोपपत्र सादर झाले आहे. यामध्ये त्यांना तीन वर्षांपेक्षा जादा शिक्षा होऊ शकते, अशा गुन्ह्यांचे दोषारोपपत्र आहे. शिंदे म्हणाले, दुर्गेश पवार टोळीने गोकुळनगर, तसेच म्हमद्याचे वास्तव्य असलेल्या संजयनगरमध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांच्या पडद्याआड राहून संघटित गुन्हेगारी कारवाया सुरू होत्या. यामध्ये आर्थिक फायदा मिळविण्याचा त्यांचा उद्देश होता. रवींद्र कांबळेच्या खुनामुळे ते चांगलेच चर्चेत आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन मोकांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. पोलिस उपअधीक्षक सुहास बावचे, निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर तो मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस निरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सादर केला होता. त्यानुसार महानिरीक्षकांनी मोक्का लावण्यास मंजुरी दिली आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णकांत उपाध्याय, उपअधीक्षक सुहास बावचे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक बाजीराव पाटील, संजयनगरचे प्रदीपकुमार जाधव उपस्थित होते....ही तर सुरुवात : दत्तात्रय शिंदेजिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. पत्रकारांच्या पहिल्याच भेटीत त्यांनी कामाची दिशा स्पष्ट करून, ती बोलण्यापेक्षा कृतीतून दिसेल, असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी दुर्गेश पवार टोळीला मोक्का लावून कारवाईचा दणका दिला आहे. ते म्हणाले, यापुढे शहरात असो अथवा जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्या रेकॉर्डवर आल्या, तर त्यांना सोडणार नाही. ही तर सुरुवात आहे. जेव्हा-जेव्हा गुन्हेगारी टोळ्या डोके वर काढतील, तेव्हा त्यांच्याविरुद्ध मोक्का तसेच झोपडपट्टीदादा कायद्याचे हत्यार उपसले जाईल. एकाही टोळीला सक्रिय होऊ देणार नाही.