पाडळीत दुरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:00 AM2021-01-13T05:00:03+5:302021-01-13T05:00:03+5:30

नवे पारगाव : दरवेश पाडळी (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पारंपरिक गटात दुरंगी काटाजोड लढत होत आहे. एकही अपक्ष ...

Durangi fighting in Padli | पाडळीत दुरंगी लढत

पाडळीत दुरंगी लढत

googlenewsNext

नवे पारगाव : दरवेश पाडळी (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पारंपरिक गटात दुरंगी काटाजोड लढत होत आहे. एकही अपक्ष नसल्याने दोन पॅनेलमधील उमेदवारांत धुमशान लढती होत आहेत. दोन्हीही पॅनेलने भावकी - भावकीतील तोडीस तोड उमेदवार दिला आहे. गाव तसं चांगलं, पण राजकारण तापलं की काही खरं नाही, अशी स्थिती या गावाची आहे. यापूर्वी अनेक गट होते, पण गतवेळच्या निवडणुकीपासून सर्वच गट दोन गटात एकत्रित झाले आहेत. त्यामुळे एकमेकांसमोर तुल्यबळ आहेत.

सत्ताधारी ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलची धुरा माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मुळीक सांभाळत आहेत, तर विरोधी घोगराई ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच प्रकाश पाटील करीत आहेत. दोन्हीही पॅनेलचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. प्रचार यंत्रणा पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होण्यासाठी सतर्क आहे. कोणत्याही कारणावरून दोन्ही गट आमने-सामने येत असल्याने हे गाव संवेदनशील झाले आहे. चार प्रभागात गाव आणि वाडी, वस्ती व मळा यांचा समावेश असल्याने उमेदवारांचा प्रचार करताना दमछाक होत आहे. दोन्ही गटांचे मिळून २२ उमेदवार असल्याने मोठी चुरस होणार आहे. ज्योतिर्लिंग ग्रामविकास सत्ता राखण्यासाठी आणि घोगराई ग्रामविकास सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलमधून पॅनेलप्रमुख बाळासाहेब मुळीक यांच्या पत्नी शारदा मुळीक यांच्यासह वैशाली गायकवाड व आक्काताई दाभाडे या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या पुन्हा निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक एकमध्ये ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलकडून राहुल वसंत जाधव पाटील, तर घोगराई पॅनेलमधून शिवाजी राजाराम जाधव पाटील या चुलत भावांमधील लढत ही लक्षवेधी मानली जात आहे.

चौकट

सासरा विरुद्ध जावई

प्रभाग क्रमांक एकमधून घोगराई पॅनेलमधून सासरे निवृत्ती गणपती वाघमोडे यांच्याविरोधात ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलमधून जावई सागर संभाजी माने यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे सासरा विरुद्ध जावई या लढतीची चर्चा पाडळी परिसरात होत आहे. या लढतीत जिंकणार कोण, याकडे लक्ष वेधले आहे.

एकूण मतदान : २६००, एकूण जागा : ११, एकूण प्रभाग : ०४ ------

Web Title: Durangi fighting in Padli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.