शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या जयघोषात दुमदुमली नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी...’ अशा जयघोषात परिसर दुमदुमून गेला.

मिरजकर तिकटी येथून दुपारी बारा वाजता या मिरवणुकीचे उद्घाटन उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल बोंगाळे यांच्या हस्ते झाले. बिनखांबी गणेश मंदिर, कोठीशाळा, अर्धा शिवाजी पुतळा चौक अशी मिरवणूक काढण्यात आली. तिचा समारोप उभा मारुती चौकात झाला. यात माजी नगरसेवक पिंटू राऊत, सचिन चव्हाण, सुरेश जरग, शिवतेज खराडे, अक्षय मोरे, सूरज आमते, अभिषेक शिंदे, पृथ्वीराज सरनोबत, अभिषेक इंगवले, राजू माने, निखील कोराणे आदी शिवभक्त व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जागोजागी अश्वारूढ पुतळ्यावर फुलांची उधळण करण्यात आली. सायंकाळी इतिहास अभ्यासक प्रा. मधुकर पाटील यांचे ‌जगावे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, लढावे छत्रपती संभाजी महाराजांसारखे या विषयावर व्याख्यान झाले.

--------------

चौकट..

लक्षवेधी ऐतिहासिक गडाची प्रतिकृती

उभा मारुती चौकात शिवाजी महाराज मोहीम फत्ते करून आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी उजळून गेलेला गड अशी ४५ फुट बाय ६० फुट अशी प्रतिकृती सादर करण्यात आली आहे. विविध रंगांतील एलईडी लाईटचा प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यामुळे येथील वातावरण उत्साही व लक्षवेधी ठरत आहे. स्टेजवरील सजावट बाबासाहेब कांबळे यांनी केली आहे. याचे उद्घाटन सायंकाळी मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

--------------

फोटो : १७०२२०२०-कोल-शिवाजी पेठ०१, ०२

ओळी : कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंती उत्सवानिमित्त बुधवारी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडो शिवभक्त सहभागी झाले होते.

(छाया : आदित्य वेल्हाळ)