शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवेळच्या पावसाने कोल्हापूरला हुडहुडी, कमाल तापमानात १० अंश सेल्सिअसने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 20:04 IST

Winter Session Maharashtra, kolhapurnews दक्षिण भारतातील निवार चक्रीवादळ आणि उत्तर भारतातील थंडीची लाट या दोन्हींचा एकत्रित परिणामांमुळे झालेला पाऊस आणि झोंबणाऱ्या गार वाऱ्यांनी शनिवारी कोल्हापूरकरांना चांगलीच हुडहुडी भरवली.

ठळक मुद्देकमाल तापमानात १० अंश सेल्सिअसने घट पारा ३१ वरून २२ अंश सेल्सिअसवर

कोल्हापूर : दक्षिण भारतातील निवार चक्रीवादळ आणि उत्तर भारतातील थंडीची लाट या दोन्हींचा एकत्रित परिणामांमुळे झालेला पाऊस आणि झोंबणाऱ्या गार वाऱ्यांनी शनिवारी कोल्हापूरकरांना चांगलीच हुडहुडी भरवली.

भुरभुरणाऱ्या पावसासोबतच पहाट उगवली. आठनंतर पाऊस थांबला तरी दिवसभर ढगाळ वातावरण आणि अंगात हुडहुडी भरवणाऱ्या गार वाऱ्यामुळे अवघे जनजीवनच गारठून गेले. शुक्रवारपर्यंत कमाल तापमानाचा ३१ अंशांवर असणारा पारा शनिवारी एकदम २२ अंशांपर्यंत खाली आला.बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम कोल्हापूरवरही होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. शुक्रवारी रात्रीपासूनच वारे सुटल्याने वादळाची चाहूल लागली. मध्यरात्रीपासून वाऱ्याचा वेग वाढत गेला आणि भुरभुर पाऊस सुरू झाला. सकाळी आठपर्यंत तो सुरूच राहिला.

पाऊस थांबला तरी वातावरण गच्च राहिले. गार वाऱ्यामुळे दिवसभर कमालीची थंडी जाणवत होती. सूर्यदर्शन अजिबात झाले नाही. कुंद आणि नीरसवाणे वातावरण राहिले. अजून एक दिवस असेच वातावरण राहणार आहे. त्यानंतर कमाल तापमान ३१ पर्यंत जाणार आहे. अंशत: ढगाळ वातावरण राहील; पण किमान तापमान १५ ते १६ अंशांपर्यंत खाली येणार असल्याने थंडीचा सामना करावा लागण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनkolhapurकोल्हापूर