शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ..अन् देव गावात येण्याच्या पर्वणीला नृसिंहवाडीकर मुकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 19:43 IST

नृसिंहवाडी : कृष्णा नदीचे पाणी आल्यानंतर देव गावात येण्याची परंपरा आहे. प्रत्यक्ष दत्त महाराज आपल्या गावात येणार या आनंदाने ...

नृसिंहवाडी : कृष्णा नदीचे पाणी आल्यानंतर देव गावात येण्याची परंपरा आहे. प्रत्यक्ष दत्त महाराज आपल्या गावात येणार या आनंदाने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावत नाही. पुराने गेले काही वर्ष सलग उत्सव मूर्ती गावात येण्याचा आनंद वाडीकरांना मिळाला. यंदा संततधार पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होवून मंदिर पाण्याखाली गेले. मात्र, सद्या पावसाने उघडीप दिल्याने पुराचे पाणी ओसरु लागले. त्यामुळे देव गावात येण्याच्या पर्वणीला नृसिंहवाडीकर मुकले

कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले व दत्त महाराजांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश आदी राज्यातून दत्तभक्त मोठ्या संख्येने येतात. देवस्थानला वेगळे धार्मिक अधिष्ठान असून आजही मंदिरात अनेक प्रथा परंपरा जपल्या जातात. हे तीर्थक्षेत्र कृष्णा व पंचगंगा नद्यांवर वसल्याने गावाला सातत्याने पुराला सामोरे जावे लागते. मात्र पुरातही येथील पुजारी व ग्रामस्थ प्रथा व परंपरा मोठ्या उत्साहाने जपतात.कृष्णा नदीला पाणी वाढल्यास व महाराजांच्या मनोहर पादुकांचे जवळ पाणी आल्यास येथे दक्षिणद्वार सोहळा मोठया उत्साहात संपन्न होतो. यावेळी दर्शनासाठी व स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिरात पाणी आल्यास उत्सव मूर्ती मंदिराच्या सुरुवातीला असलेल्या टेंबे स्वामी मठात नेण्यात येते व त्या ठिकाणीच महाराजांची त्रिकाल पूजा अर्चा व धार्मिक विधी केले जातात. त्याठिकाणी ही पुराचे पाणी आल्यानंतर देव गावात येण्याची परंपरा आहे. प्रत्यक्ष दत्त महाराज आपल्या गावात येणार या आनंदाने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावत नाही. सुवासिनींकडून मंगल आरती केली जाते. पुजारी मंडळी उत्सवमूर्ती व सनकदिक देव आनंदाने मिरवणुकीने गावात आणतात. हा अभूतपूर्व सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो. नदीचे पाणी वाढल्यावर देव गावात आणले जातात तसेच पाणी कमी झाल्यावर दत्त मंदिरपूर्ण रिकामे होण्यापूर्वी देव पुन्हा मंदिरात आणले जातात. संततधार पावसामुळे यंदा मंदिर पाण्याखाली गेले मात्र पावसाचा जोर ओसरल्याने देव गावात येण्याच्या  पर्वणीला नृसिंहवाडीकर मुकले.