शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 07:42 IST

बिबट्याच्या हल्ल्यांमुळे लोकांच्या राहणीमानात आता  बदल होत आहेत.  शेतकऱ्यांनी जनावरांचे गोठे बंदिस्त केले आहेत. जनावरे चारायला सोडणे बंद केले आहे.

सरदार चौगुलेपन्हाळा (जि. कोल्हापूर) : जंगलात मुक्तसंचार करणाऱ्या बिबट्याचा अधिवास लोकांनी धोक्यात आणल्यानंतर बिबट्याने मानववस्तीत शिरकाव करून लोकांची झोप उडवून टाकली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराकडच्या लोकवस्ती पाळीव प्राण्यावर हल्ला करून त्यांना भक्ष्य बनवत आहे. भविष्यात बिबट्या नरभक्षक होण्यास वेळ लागणार नाही. यावर गांभीर्याने विचारमंथन होणे गरजेचे आहे. जसे बिबट्याने जगण्यासाठी आपले राहणीमान बदलले तसे मानवाने सुद्धा बिबट्यापासून संरक्षणासाठी आपले राहणीमान बदलण्यास सुरूवात करणे गरजेचे आहे.

बिबट्याच्या अधिवासावर हस्तक्षेप झाल्याने त्याने उसाच्या फडात मुक्काम ठोकला. दिवसभर उसाच्या फडात राहायचे, तर रात्री लोकवस्तीतील पाळीव प्राण्यांना भक्ष्य करायचे, हा त्याचा नित्यक्रम मोठी  समस्या होऊन बसली आहे. कोणताही हिंस्त्र प्राणी मानवावर विनाकारण हल्ला करत नाही. त्याला धोका अगर अधिवासात उपद्रव केला तरच तो हल्ला करतो म्हणून बिबट्याशी संघर्ष करणे टाळले पाहिजे.

बिबट्याच्या हल्ल्यांमुळे लोकांच्या राहणीमानात आता  बदल होत आहेत.  शेतकऱ्यांनी जनावरांचे गोठे बंदिस्त केले आहेत. जनावरे चारायला सोडणे बंद केले आहे. डोंगराकडच्या गावातील लोक रात्री-अपरात्री एकटेदुकटे फिरत नाहीत. जंगल किंवा बिबट्याचा वावर असणाऱ्या रस्त्यावर लोक प्रवास टाळत आहे. शेतीच्या कामासाठी मजूर मिळणे मुश्किल होत आहे. पिकांना रात्री सोडा दिवसाही पाणी पाजण्याचे धोक्याचे ठरत आहे. 

पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या डोंगराकडेला माझा जनावरांचा गोठा आहे. बिबट्याने गोठ्यातील राखणीवर कुत्रे मारल्यावर गोठा बंदिस्त केला. जनावरे चारायला सोडायची बंद केली. बिबट्याचा बंदोबस्त केला नाही तर जनावरे पाळणे बंद करावे लागेल.- ऋषिकेश बाबा शिंदे, आसुर्ले, ता.पन्हाळा

लोकांनी आपले राहणीमान बदलणे गरजेचे आहे. गोठे बंदिस्त करावे, टाकाऊ अन्नाची योग्य विल्हेवाट लावावी, शेतात खाली वाकून किंवा बसून काम करणे धोक्याचे आहे. - प्रदीप सुतार, वन्यजीव बचाव पथक प्रमुख, कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard fear halts grazing, changes lives in Kolhapur villages.

Web Summary : Leopard intrusion in Kolhapur due to habitat loss forces lifestyle changes. Farmers confine livestock, avoid night travel, and face labor shortages. Experts advise securing enclosures and proper waste disposal to mitigate conflict.
टॅग्स :leopardबिबट्या