शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

चलन टंचाईमुळे रस्त्यावरचा संसार अडकला दुहेरी संकटात !

By admin | Updated: December 23, 2016 00:17 IST

व्यवसायावर विपरीत परिणाम : शेतकऱ्यांसाठी औजारांच्या गरजा पूर्ण करताना पैशांमुळे अडचणी, औजारांची मागणी घटली

विक्रम पाटील --- करंजफेण --रस्त्यावरचं जगणं आमचं जशी तव्यावर करपते भाकरी। टिचभर खळगी भरण्यासाठी करतो मरणापर्यंत चाकरी।। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गॅस सिलिंडर, मायक्रो ओव्हनचा सगळीकडे वापर होत असला तरी भात्यावर जेवण बनवून खाणाऱ्या घिसाडी कुटुंबातील लोकांची परवड अजून संपलेलीदिसत नाही. मिळेल त्या ठिकाणी थंडी-वाऱ्याची तमा न बाळगता बस्थान मांडून उघड्यावर संसार मांडलेले दृश्य पन्हाळा पश्चिम परिसरामध्ये दृष्टिक्षेपात पडत आहे.शासन निरनिराळ्या योजना राबवून नागरिकांना समान पातळीवर आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना दुष्काळ व अपुऱ्या पावसामुळे मराठवाडा, विदर्भातील आर्थिक संकटात सापडलेल्या घिसाडी समाजातील लोकांना गावोगावी भटकंती करून शेतकऱ्यांना आवश्यक असणारी शेती औजारे बनवून देऊन आपल्या पोटाची खळगी भरावी लागत आहेत. गवत कापणी व उसाचा हंगाम लक्षात घेऊन या कुटुंबांचे पाय कोल्हापूर जिल्ह्याकडे वळतात. शेतकऱ्यांना विळा, कुऱ्हाड, कोयता, नांगर इ. औजारे बनवून दिल्यास त्या मोबल्यात त्यांना रोख पैसे अगर धान्याच्या रूपात मोबदला मिळतो. त्यामुळे पन्हाळा पश्चिम परिसरामध्ये या समाजातील अनेक कुटुंबे दिसत आहेत. ही कुटुंबे शेती औजारे बनवून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करीत असले तरी, सद्य:स्थितीला चलन तुटवड्याचा त्यांच्या व्यवसायावर विपरुीत परिणाम झाल्याचे दिसत आहे. ही कुटुंबे शेती औजारे बनवून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करीत असले तरी गावाकडील दुष्काळ व चलन टंचाईमुळे त्यांचा व्यवसाय दुहेरी संकटात सापडला आहे. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे पारंपरिक शेती औजारांना मागणी कमी होऊ लागल्यामुळे या व्यवसायावर विपरित परिणाम झाल्याचे दिसत आहे.या लोकांच्या नियमितच्या भटकंतीमुळे त्यांच्या लहान मुलांना शाळेतील धडे गिरविणे म्हणजे एक स्वप्नच बनून राहते. राहत्या गावी कोणी जवळचा नातेवाईक असेल, तर तेथे राहून ती मुले जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण घेतात. हे शिक्षण म्हणजे त्यांचे ग्रॅज्युएटच म्हणावे लागेल. अन्यथा या समाजातील मुले आपल्या वाडवडिलार्जित पारंपरिक व्यवसायात रमतात.तरी अशा कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे. गावाकडे पाऊस कमी होत असल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न भेडसावतो. त्यामुळे मुलांना घेऊनच विंचवाच्या संसारासारखं फिरावं लागतं. त्यामुळे आमची मुले अडाणी राहू लागली आहेत, तरी शासनाने आमच्या मुलांना सरकारी वसतिगृहात शिक्षणासाठी सामील करून घ्यावे व आर्थिक मदत करावी.- अमोल सोळंके , घिसाडी व्यावसायिक