संभाजी जाधव यांच्यासारख्या सेवकांमुळे सहकारी संस्था नावारूपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:00 AM2021-01-13T05:00:19+5:302021-01-13T05:00:19+5:30

भोगावती : राधानगरी तालुक्यातील अनेक सहकारी संस्था चुकीच्या नियोजनामुळे अवसायनात गेल्या. काही संस्थांनी आपली दुकाने बंद केली. मात्र, संभाजी ...

Due to servants like Sambhaji Jadhav, the co-operative society came to be known | संभाजी जाधव यांच्यासारख्या सेवकांमुळे सहकारी संस्था नावारूपास

संभाजी जाधव यांच्यासारख्या सेवकांमुळे सहकारी संस्था नावारूपास

Next

भोगावती :

राधानगरी तालुक्यातील अनेक सहकारी संस्था चुकीच्या नियोजनामुळे अवसायनात गेल्या. काही संस्थांनी आपली दुकाने बंद केली. मात्र, संभाजी जाधव यांच्यासारख्या सेवकामुळे तालुक्यातील अनेक सहकारी संस्था नावारूपाला आल्या, असे मत भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर यांनी व्यक्त केले.

काैलव(ता. राधानगरी) येथील लक्ष्मी सहकारी दूध संस्थेचे सचिव संभाजी जाधव यांच्या सेवानिवृत्तनिमित्त सत्कार करण्यात आला. धैर्यशील पाटील-काैलवकर यांच्या हस्ते संभाजी जाधव व त्यांच्या पत्नी सुवर्णा जाधव यांचा सत्कार झाला. यावेळी प्रा. टी. एम. पाटील, ए. के. चाैगले यांची भाषणे झाली. दत्ता पाटील यांनी स्वागत केले. यावेळी शिवाजीराव पाटील, मधुकर पाटील, सदाशिव पाटील, आकाराम चरापले, विश्वास पाटील, आनंदा पाटील, दिनकर चरापले, शंकर पाटील, बी. एम. चरापले, एम. डी. चरापले, धनाजी पाटील, उदय जाधव, स्वप्निल जाधव उपस्थित हाेते. प्रा. सुहास जाधव यांनी आभार मानले.

फाेटाे ओळी :

काैलव येथील लक्ष्मी दूध संस्थेचे सचिव संभाजी जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करताना धैर्यशील पाटील-कौलवकर व अन्य मान्यवर.

Web Title: Due to servants like Sambhaji Jadhav, the co-operative society came to be known

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.