शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

स्मशानशेड नसल्याने ग्रामस्थांची कुचंबणा

By admin | Updated: May 22, 2015 00:08 IST

पन्हाळा तालुका : दहा गावांत स्मशानशेडच नाही

किरण मस्कर - कोतोली -ऐन पावसाळ्यामध्ये पन्हाळा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींना स्मशानशेडच नसल्याने ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होणार आहे. याबाबत पन्हाळा पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाशी संपर्क साधला असता, तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे स्मशानशेडबाबत आपला अहवाल पाठविलेला नाही. त्यामुळे या १७ ग्रामपंचायतींची माहिती उपलब्ध झालेली नाही.यामध्ये प्रामुख्याने ३५ ग्रामपंचायतींना स्मशानशेड आहे; पण त्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. याठिकाणचे दुरुस्ती अहवाल पंचायत समितीकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच ५४ ग्रामपंचायतींची स्मशानशेड सुसज्ज अवस्थेत आहेत, तर वाळवेकरवाडी, बादेवाडी, बोंगेवाडी, काळजवडे, कसबा ठाणे, किसरूळ, कुंभारवाडी, मानवाड, परखंदळे, पिसात्री, पोंबरे, आदी गावांना नवीन स्मशानशेड मंजूर करण्यात आली आहेत.जी १० ते ११ गावे स्मशानशेडविना आहेत, त्याच गावांना नवीन मंजुरी मिळाली आहे. तर तालुक्यामधील एकूण १५ गावांना संयुक्त स्मशानशेड बांधण्यात आली आहेत. त्यामुळे या १५ स्मशानशेडचा विषय मार्गी लागला आहे. ज्या ठिकाणी स्मशानशेड नाही, त्या ठिकाणी जनसुविधा योजनेंतर्गत नवीन स्मशानशेड मंजूर केले जाते. यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे. ते प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे पाठविले जातात व त्यानुसार निधी उपलब्ध होतो.- बी. एम. कांबळे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती पन्हाळा.प्रशासकीय मान्यता आता मिळाली तर त्याचे टेंडर निघण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी जातो. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ही कामे पूर्ण होत नाहीत. ज्या ठिकाणी जुनी स्मशानशेड आहेत, अशा ठिकाणची रिपेअरी करून किमान पावसाळ्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीने काम करून घ्यावे, त्यासाठी पंचायत समितीकडून सहकार्य केले जाईल.- सुनीता पाटील, सभापती, पन्हाळा पंचायत समिती.